औंध : भारतीय समाजाला नव्या दिशा, नवे क्षितिज, नवा प्रकाश दाखविण्याचे कार्य अण्णा भाऊ साठे यांनी केले, असे मत औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक विजय शेवाळे यांनी येथे मांडले.बोपोडी सिग्नल चौक, आंबेडकर नगर, बोपोडी व औंध क्षेत्रीय कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी शेवाळे बोलत होते.याप्रसंगी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी महापौर सुरेश शेवाळे, आरपीआय गटनेत्या सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, विकास साठे, धनंजय जगताप, सुजित जाधव, अंकुश साठे, पार्श्वगायक राहुल शिंदे, आनंद जुनवने, सोमनाथ तिखे, अशोक कदम, भीमराव माने, जगन जाधव, दीपक कांबळे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र वैराट, विजय भोईर, शीला रासकर आदी उपस्थित होते.यावेळी गरजू लहान मुलांना खाऊ, वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
औंध-बाणेरमध्ये अण्णा भाऊंची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:11 IST