पिंपरी : राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे. त्यांच्या विरोधात पदाधिका:यांपासून कर्मचारी-अधिका:यांच्याही तक्रारी आहेत. परंतु, पद आणि राजकारण्यांनी दिलेले बळ यांमुळे उघडपणो तक्रारी कोण करत नव्हते. मात्र, दरोडय़ाचा गुन्हा खंडाळा पोलिसांनी मंगळवारी दाखल केल्याने आता शिंदे यांच्या विरोधात अनेक जण उघडपणो बोलू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वडवाडी-शिरवळ येथे शासनाची पिवळा दिवा असलेली मोटार घेऊन जात तेथील शेतक:यांना जमिनीच्या वादातून धमकावल्याबद्दल खंडाळा पोलिसांनी मंगळवारी शिंदे यांच्यावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला.
या निमित्ताने जकात अधीक्षक ते अतिरिक्त आयुक्त असा प्रवास असणा:या शिंदे यांचे कारनामे आता उघड होतील, अशी चर्चा महापालिका वतरुळात होती.
जकात अधीक्षक, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्तपद भूषविल्यानंतर 28 जून 2क्13 ला अतिरिक्त आयुक्त म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाली होती. महापालिकेत त्यांचे नाव विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे ‘व्यावसायिक हितसंबंध’ आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंना महापालिकेत आणण्यासाठी एका वजनदार नेत्याने लॉबिंग केले होते.
अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर त्यांच्या कक्षात बिल्डर, जमीन खरेदी-विक्री करणारांचाच राबता असायचा.
कार्यालयात बसून ते मावळ, मुळशी, खेडमधील शेतक:यांना बोलावून दमबाजी करीत असल्याच्या तक्रारीही यापूर्वी शेतक:यांनी केलेल्या आहेत. (प्रतिनिधी)