शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय समितीबाबत अंनिस असमाधानी

By admin | Updated: January 9, 2017 04:15 IST

जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आल्याचा दावा शासनाने केला असला

पुणे : जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आल्याचा दावा शासनाने केला असला, तरीही जुनीच समिती पुढे रेटण्यात आली आहे, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने केली आहे. या समितीविषयी समाधानी नसल्याचे अंनिसने म्हटले आहे.शासनाने नुकतीच या समितीची पुनर्रचना केली आहे. २३ सदस्यांच्या या समितीमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव (सहअध्यक्ष) आणि अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व मुक्ता दाभोळकर, राज्य सचिव माधव वावगे (सदस्य) यांचा समावेश आहे. समितीमधील तसेच अन्य अशासकीय सदस्यांमध्ये पुरुषोत्तम आवारे पाटील, सुरेश झुरमुरे, छाया सावरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. २० डिसेंबर २०१३ पासून राज्य शासनाने लागू केलेल्या जादूटोणा प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. समितीची बैठक वर्षातून किमान २ वेळा होईल. समितीतील अशासकीय सदस्यांना वित्त विभागाने ठरवून दिलेले भत्ते दिले जाणार आहेत. आॅगस्ट २०१४ अन्वये स्थापन केलेल्या समितीची पुनर्रचना करण्याची गरज वाटत असल्याने पुनर्रचना केल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे. सामाजिक न्यायमंत्री या समितीचे अध्यक्ष, तर सामाजिक न्याय राज्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. (प्रतिनिधी)