शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अंनिस व हिंदुत्ववादी संघटना आमनेसामने, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन : अंनिसचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 04:29 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसकडून रविवारी सकाळी मुसळधार पावसामध्ये महर्षी शिंदे पुल ते साने गुरूजी स्मारक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार, याची विचारणा करणाऱ्या घोषणा देत ‘जवाब दो’चा पुकार यावेळी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त अंनिसकडून रविवारी सकाळी मुसळधार पावसामध्ये महर्षी शिंदे पुल ते साने गुरूजी स्मारक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याना कधी पकडणार, याची विचारणा करणाऱ्या घोषणा देत ‘जवाब दो’चा पुकार यावेळी करण्यात आला.मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सकाळीही कायम होता. भर पावसामध्ये छत्र्या, रेनकोट घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्च्यासाठी आले होते. सकाळी साडेसात वाजता महर्षी शिंदे पुलावरून मोर्चाला सुरुवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावा, कॉ. मुक्ता मनोहर, अंनिसचे सरचिटणीस हमीद दाभोलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रंगकर्मी अतुल पेठे, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.महर्षी शिंदे पूल, महापालिका, शनिवार वाडा, बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, टिळक चौक, नवी पेठ, दांडेकर पूल ते साने गुरूजी स्मारक असा मोर्चा काढण्यात आला. हू किल्ड दाभोलकर? जवाब दो, जवाब दो!, विवेकाचा आवाज बुलंद करू या, मुर्दाड शासनाचा तीव्र धिक्कार असो, लडेंगे जितेंगे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.मोर्च्याच्या सुरुवातीला बोलतानाबाबा आढाव म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या मारेकºयांना पकडून देणाºयांसाठी जाहीर केलेल्या बक्षिसाचे आकडेसुद्धा फसवे आहेत. मुख्यमंत्री सतत फक्त आकड्यांचा आधार घेऊन बोलत असतात. पण हे आकडे कधीच खरे होत नाहीत. त्यांनी दिलेला ना कर्जमाफीचा आकडा खरा ठरला,ना शेतकºयांच्या आत्महत्यांचा आकडा खरा ठरला.’’सरकार पोसतेय दहशतवाद : बाबा आढावअंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्वाचे कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला वर्षामागून वर्षे उलटत आहेत. मात्र, सरकार त्यांचे मारेकरी पकडण्यात अपयशी ठरले आहे. सरकारला मारेकरी शोधायचे आहेत का, हाच प्रश्न पडतो आहे. एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे दाभोलकर, पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाºयांचे खून हे चित्र पाहता सरकार दहशतवाद पोसत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामााजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली.सोशल मीडियावरूनही मोहीमअंनिसकडून रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये सोशल मीडियातून ‘जवाब दो’ हा हॅशटॅश वापरून दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकºयांना कधी पकडणार, याचा शासनाला जाब विचारणारी मोहीम राबविण्यात आली. शासनाचा नाकर्तेपणा, दिरंगाई यावर बोट ठेवणारे हजारो मेसेज सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आले. त्याला महाराष्टÑासह देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.अंनिस ट्रस्टची नोंदणी रद्द करालोकमत न्यूज नेटवर्कपुणे : साताºयाच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात गंभीर निरीक्षणे नोंदविल्याने अंनिसच्या ट्रस्टकडून गैरव्यवहार झाल्याचे दिसत आहे. अंनिसच्या न्यासाचे विशेष लेखापरिक्षण करण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. त्यामुळे इतरांना ‘जवाब दो’ म्हणणाºया विवेकवाद्यांनी राज्याच्या जनतेला जवाब द्यायला हवा, असे मत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केले.अंनिसची नोंदणी रद्द करण्याची मागणी घेऊन हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी स्वा. सावरकर स्मारकावर रविवारी संध्याकाळी आंदोलन केले. पुरोगामी विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांनी त्यांची वसुधा मनोविकास प्रतिष्ठानची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये विलीन केली होती.खुद्द डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी तसा जवाब स्वत:च्या स्वाक्षरीने २०१२ मध्ये दिला होता. प्रत्यक्षात ही सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांची मालमत्ता गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत मालमत्तेच्या वादामधून दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास गुन्हे अन्वेषण यंत्रणेने आणि शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली.अंनिसच्या ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळे झाले आहेत. हत्येमागे आर्थिक हितसंबंध कारणीभूत आहेत का, दाभोलकरांनी जवाब दिल्यानंतर त्यांची हत्या झाली आहे का, या महत्त्वाच्या मुद्यांचा तपासच झालेला नाही. त्यांचे खुनी पकडायचे असतील तर सर्व बाजुंनी तपास होणे आवश्यक आहे. त्यांच्या ट्रस्टची चौकशी करण्यास ट्रस्टी का टाळाटाळ करीत आहेत, असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला.विवेकवादाचा बुरखा पांघरून दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर ‘जवाब दो’ आंदोलन करणाºया अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोटाळ्यांविषयी सर्वजण गप्प काआहेत. दाभोलकरांवर श्रद्धा ठेवून अंनिसला दान करणाºयांचा पैसा जातो कुठे, असा सवाल हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला आहे.यावेळी अधिवक्ता मोहन डोंगरे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, गार्गीफाउंडेशनचे विजय गावडे, समितीचेपराग गोखले उपस्थित होते. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अंनिसलाउद्देशून त्यांच्या गैरप्रकारांचेच जवाबदो अशा हातामध्ये फलक घेऊनघोषणा दिल्या.हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, गार्गी फाउंडेशन व अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सावरकर स्मारक येथे रविवारी संध्याकाळी महाराष्टÑ अंनिसविरोधात आंदोलन केले.