शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने पेटविला डंपर

By admin | Updated: March 22, 2016 01:29 IST

एमआयडीसी रस्त्यावर मंगरुळ फाटा येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुणी ठार झाली आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाला

तळेगाव स्टेशन : एमआयडीसी रस्त्यावर मंगरुळ फाटा येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने एक तरुणी ठार झाली आणि तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दगडफेक करत आग विझविण्यासाठी आलेला अग्निशामक बंब परत पाठविला. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील मंगरूळ फाटा येथे आंबीकडून मंगरूळकडे जाणाऱ्या खडीच्या डंपरने (एमएच १४ सीपी ४७८०) नवलाख उंबरेकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १४, झेड ६७६४) धडक दिल्याने दुचाकीवरील विद्या बाळासाहेब दहातोंडे (वय २३ , बधालवाडी, ता. मावळ) ही तरुणी जागेवरच ठार झाली. दुचाकी चालविणारा तिचा भाऊ निलेश बाळासाहेब दहातोंडे (वय १८) गंभीर जखमी झाला. त्याला तळेगाव स्टेशन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर डंपरचालक सोमनाथ आत्माराम लवकरे (वय २८, रा. कार्ला, ता. मावळ) हा डंपर जागेवरच सोडून पळून गेला. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.अपघातानंतर काही वेळातच ५०० ते ६०० जणांचा जमाव मंगरूळ फाटा चौकात जमा झाला. घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चालकाच्या मदतीने सदर डंपर बाजूला घेऊन पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत असताना प्रक्षुब्ध जमावाने डंपर व पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एक पोलीस किरकोळ जखमी झाला. त्यानंतर जमावाने मिनर्वा कॉलेजसमोर डंपरची तोडफोड करत केबिनला आग लावली. संतप्त जमावाने चोहोबाजूची वाहतूक रोखून धरत रास्ता रोको केला. त्यामुळे जवळपास दोन्ही बाजूने दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)