शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

कोरोना काळात समाजासाठी मदतीला धावले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’....ही उक्ती वास्तवात सिद्ध करीत, कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जिवाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’....ही उक्ती वास्तवात सिद्ध करीत, कोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता समाजातील अनेक व्यक्ती, सामाजिक संघटना पुणेकरांच्या मदतीला धावून आल्या आहेत. कुणी प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी धडपडतंय...कुणी व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन, रुग्णालयात बेड मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतंय... तर कुणी अगदी धर्माच्या भीती ओलांडत अंत्यसंस्कार करून देण्याची सेवा बजावतंय.... गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे जे युद्ध सुरू आहे... त्यात डॉक्टर, परिचारकांसारख्या अनेक योद्धयांबरोबरच एक समाज घटक देखील लोकांसाठी जणू ‘देवदूत’ म्हणून काम करीत आहे. ना कौतुकाची अपेक्षा ना प्रसिद्धीचा मोह. निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांच्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात बेड नाहीत, ना व्हेंटिलेटर, ना इंजेक्शन.. त्यामुळे सारेच हवालदिल झाले आहेत. प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज आहे. कुटुंबातील एक किंवा दोन व्यक्ती या गोष्टी मिळविण्यासाठी हतबल ठरत आहेत. अशा वेळी गरजू लोकांच्या मदतीला काही सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटना धावून आल्या आहेत. प्लाझ्मा, रक्तदानासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आजमितीला वैद्यकीय क्षेत्रासह महापालिकेच्या सर्व यंत्रणांवर ताण आला आहे. तो कमी करण्यासाठी सर्वजण खारीचा वाटा उचलत आहेत. तरुणाईही त्याला अपवाद ठरलेली नाही. समाजाच्या आणि गरजू व्यक्तींकरिता तरुणाईने पुढाकार घेतला आहे. जवळच्या व्यक्तींना मदत करण्यासाठी युवा पिढी सरसावली आहे. कोरोनाची लढाई एकट्या-दुकट्याची नाही तर ती मिळून लढायची आहे. तरच त्यावर मात करण्यात यश मिळेल याचा प्रत्यय शहरात अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात यंत्रणेवरचा ताण हलका होण्यास मदत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

--------------------------------------------------------------------------------

सायली धनाबाई, सावली फौंडेशन

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करतात. रुग्णांना रक्त मिळवून देतात.

कोट -

‘बेड्स, इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे कामही करत आहोत. आता नवीन उपक्रम सुरू करीत आहोत. पाटील इस्टेटसह शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या लोकांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासणार आहोत. ज्यांना लक्षणे दिसत आहेत त्यांना कोरोना टेस्ट करायला सांगू. सर्वजण ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर बेड लागेल तेव्हा काम करीत आहेत. पण, रुग्ण वाढणार नाहीत यासाठी महापालिका किंवा कुणीच काम करीत नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्यातून मृत्यूदर वाढत आहे. आम्ही गर्दीच्या ठिकाणी राहाणाऱ्या लोकांची चाचणी करणार आहोत. आमचे काम नगर, पुरंदर तालुक्यातही सुरू आहे. शनिवार पेठेतील ‘द सावली अभ्यासिका’ येथे प्लाझ्मा दानासाठी कार्यालय सुरू करीत आहोत. ज्यांना प्लाझ्मा हवाय किंवा दाते व्हायचंय त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा.’

-------------------------------------------------------------------------------------------------------

जावेद खान, उन्मत संस्था

कोरोनामुळे निधन झालेल्या ३०० जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.

कोट -

‘सध्या वैकुंठ स्मशानभूमीवर ताण आला आहे. कोरोनाने निधन झालेल्या अनेकांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहे. आमच्या संस्थेने त्यांचे अंत्यसंस्कार करून देण्यासाठी पुढाकार घेतला असून, सदाशिव पेठेतील स्मशानभूमीत एक जागा मागून घेतली आहे. ससूनला २८ पार्थिव अशी होती ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. मग आम्ही त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून हिंदू धर्मपद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यास आम्ही सुरूवात केली. पण कुणीही आक्षेप घेतला नाही. पुणे कोरोनाने धगधगत आहे. या परिस्थितीत कुणीही जातीपातीचा राजकारण करता कामा नये. आत्तापर्यंत ३०० हिंदूंच्या पार्थिवावर संस्थेने अंत्यसंस्कार केले आहेत.”

---------------------------------------------