शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांच्यासाठी डॉक्टरच बनले देवदूत

By admin | Updated: March 31, 2017 02:31 IST

मागील काही दिवसांमध्ये डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील वादावर मोठा गोंधळा झाला. राज्यभरातील

रवीकिरण सासवडे / बारामतीमागील काही दिवसांमध्ये डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमधील वादावर मोठा गोंधळा झाला. राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीबाबत संपही केला. मात्र, बारामतीत घडेलेल्या एका घटनेमुळे डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांमधील आपुलकीचे नातेदेखील उजेडात आले. उपचारांसाठी कोणताही खर्च न घेता बाळाला आणि त्यांच्या आईला येथील डॉक्टरांनी नवजीवन दिले. भिगवण स्टेशन येथे राहणारे दत्तात्रय रामचंद्र शालघर यांचा हातगाड्यावर आइस्क्रीम विक्रीचा व्यावसाय आहे. त्यांची मुलगी नलिनी अनिल बुलबुले हिची बारामती येथील महिला शासकीय रुग्णालयामध्ये रविवारी (दि. २६) प्रसूती झाली. येथील डॉ. गणेश श्रीरामे यांनी त्यांच्यावर उपचार केले. नलिनी यांना मुलगा झाला; मात्र बाळाला ताप आल्याने अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक होते. डॉ. श्रीरामे यांनी बारामती येथील डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांच्याशी संपर्क साधून बाळाच्या प्रकृतीची कल्पना दिली. तसेच, बाळाच्या नातेवाइकांची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्याचे सांगितले. डॉ. मुथा यांनीदेखील बाळाला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. यादरम्यान नलिनी यांना रिक्षामधून घेऊन येताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. श्रीराम गल्ली बारामती येथील विशाल चव्हाण व नितीन चव्हाण यांनी तातडीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. या दोघांनी त्यांच्या औषधोपचाराचाही खर्च दिला. नलिनी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डॉ. सौरभ मुथा यांच्या रुग्णालयात बाळाजवळ आणले. नलिनी यांचे वडील दत्तात्रय शालघर मुलीजवळ थांबून होते. मदतीसाठी दुसरे कोणी नातेवाईक नाहीत. तसेच, शालघर यांची पत्नी व नलिनी यांची आई अपंग असल्याने त्याही रुग्णालयात येऊ शकत नव्हत्या. यादरम्यान बाळाच्या औषधोपचारांचा खर्च कमी करून व बाळाच्या आईसाठीच्या जेवणाची व्यवस्था डॉ. मुथा यांनीच केली. बाळ बरे झाल्यानंतर बिल न घेता त्याला गुरुवारी घरी सोडले. त्यांना प्रवासखर्चही देण्यात आला. बाळाला घरी घेऊन जाताना मात्र नलिनी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यादरम्यान रुग्णालयातील दूरध्वनीवर डॉक्टरांना धमकीवजा फेन येऊ लागले. ‘‘बुलबुले पेशंट कुठे आहे. तुम्ही तिथे काय करता?’ अशा पद्धतीने फोनवरील व्यक्ती धमकावत होती. मात्र, त्याच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांनी उपचार सुरू ठेवले. फोनवरील नराधमांनी या घटनेसंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावरून वायरल केला. मात्र, कोणालाही न जुमानता डॉ. राजेंद्र मुथा यांनी बाळावर उपचार सुरू ठेवले.