शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...आणि उमेदवारांचे धाबे दणाणले!

By admin | Updated: January 11, 2017 02:36 IST

खर्चाचा ताळमेळ १३ जानेवारीपर्यंत द्या; अन्यथा पुढील ६ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरा, असा आदेशच निवडणूक आयोगाने दिला आहे.

बारामती : खर्चाचा ताळमेळ १३ जानेवारीपर्यंत द्या; अन्यथा पुढील ६ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरा, असा आदेशच निवडणूक आयोगाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमधील विजयी, पराभूत उमेदवारांची धावपळ उडाली आहे. खर्चाचा ताळमेळ जुळविण्यात विजयी, पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते अद्याप व्यस्त आहेत. यंदा नगरपालिकेच्या निवडणुकांवर बारकाईने लक्ष निवडणूक आयोगाने घातले. उमेदवारांना खर्चाची मर्यादा होती. त्यातच ताळमेळ ठेवून खर्च करणे बंधनकारक होते. या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व नगरपालिकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षेत स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. त्यामुळे उमेदवारांनी सादर केलेला वैयक्तिक खर्च, त्याचबरोबर पॅनल अथवा पक्षाने एकत्रित केलेला खर्चाचा मेळ बसणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर देखील निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उमेदवारांकडून खर्चाचा तपशील घेण्यासाठी धावपळ उडाली आहे. पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकांचा खर्च १५ जानेवारी पर्यंत पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये विजयी अथवा पराभूत उमेदवाराने टाळाटाळ केल्यास थेट आचार संहितेचा भंग म्हणून ६ वर्ष निवडणुकीस अपात्र ठरविण्यात येईल, असे देखील सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर देखील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना खर्चाचा ताळेबंद सादर करावा, यासाठी पाठपुरावा करीत आहेत. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचा तपशील एकत्रित खर्चाबरोबर जुळला तरच त्या उमेदवाराची खैर आहे. त्यामध्ये मर्यादेपेक्षा जादा खर्च झाला असेल तरी त्याची कारणे उमेदवाराने देणे आवश्यक आहे. या संदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलेले बारामतीचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितले की, खर्चाच्या बाबतीत उमेदवारांना पळवाटा काढता येणार नाही. खर्चाचा तपशील उमेदवारांनी देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)पक्ष आणि वैयक्तिक उमेदवाराने केलेला खर्च देखील मर्यादेपेक्षा जास्त झाला नसेल, याची काळजी उमेदवारांनी, पक्षाने घ्यायची होती. त्यानुसारच खर्चाचा तपशील १३ जानेवारी पर्यंत सादर करायची आहे. यासाठी निवडणूक आयोगाने ह्यळफवए श्डळएफ टडइकछए अढढह्ण द्वारे आॅनलाईन देखील सादर करणे शक्य आहे. अथवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हस्तलिखित खर्च सादर करावा.