शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

...आणि इच्छुकांचे मंडप उतरले

By admin | Updated: February 11, 2017 02:57 IST

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपापला उमेदवारीवरील हक्क सांगायला सुरुवात केली होती

पुणे : महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपापला उमेदवारीवरील हक्क सांगायला सुरुवात केली होती. विशेषत: भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच पत्रकबाजीला सुरुवात केली होती. या इच्छुकांना शेवटच्या क्षणापर्यंत ‘तुम्हाला उमेदवारी देऊ,’ असे आश्वासन देत झुलवत ठेवण्यात आले. मात्र, उमेदवारी वाटपादरम्यान भलेभले ‘गारद’ झाले. या गारद इच्छुकांचा केवळ उत्साहच नाही तर त्यांचे मंडपही उतरू लागले आहेत. राजकीय पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ‘कामाला’ लागण्याच्या सूचना शहर पदाधिकारी आणि आमदार, खासदारांनी दिलेल्या होत्या. अनेक पक्षांमध्ये शहर पातळीवर काम केलेले आणि विधानसभा क्षेत्रामध्ये उत्तम जनसंपर्क असलेले अनेक इच्छुक समोर आले. विद्यमान नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आपल्याला उमेदवारी मिळणार, अशी आशा बाळगून होते. दरम्यान, सर्वच पक्षांमध्ये चढाओढीच्या राजकारणाला रंग भरू लागला होता. कोण कोणाचा पतंग कापतो आणि कोणता मासा कोणत्या पक्षाच्या गळाला लागतो याची रणनिती आखण्यात पक्षांचे धुरंदर मग्न होते. आपापल्या ‘गॉड फादर’कडे तिकिटासाठी आशाळभूतपणे डोळे लावून बसलेल्यांना आगाऊ इशारे मिळालेले होते. या इशाऱ्यांमुळे ‘उमेदवारी पक्की’ असा भाबडा समज झालेल्या इच्छुकांनी सरळ निवडणूक कचेऱ्या उघडल्या. टेबलं मांडून कार्यकर्ते बसवले. मतदारयाद्या छापून घेत प्रचाराला सुरुवात झाली. कार्यकर्तेही आपला भाऊ, आपली ताईच आता रिंगणात उतरणार म्हणून जोमाने कामाला लागले. कार्यकर्तृत्वाची साक्ष असलेली पत्रके छापून घेण्यात आली. ही पत्रके घरोघर जाऊ लागली.(प्रतिनिधी)