शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन् आईला भेटली तिची चिमुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 03:27 IST

येथील संभाजीनगर परिसरात गुरुवारी सकाळी रस्त्याच्याकडेला सहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. रस्ता चुकल्यामुळे कुठे जावे, हे तिला समजत नव्हते.

पांडुरंग मरगजेधनकवडी : येथील संभाजीनगर परिसरात गुरुवारी सकाळी रस्त्याच्याकडेला सहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. रस्ता चुकल्यामुळे कुठे जावे, हे तिला समजत नव्हते. तिची ही अवस्था एका महिलेने पाहिली आणि त्यांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी आल्याने त्यांनी सुखरूप त्या मुलीला तिच्या घरी पोहोचवले.धनकवडी येथील संभाजीनगर परिसरात मुख्य रस्त्याकडेला हातात पिशवी घेऊन रडणारी मुलगी पाहून तिची विचारपूस करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. गर्दी पाहून दुचाकीवरून निघालेले धनकवडी पोलीस चौकीचे पोलीस व्यंकट पवार व सुधीर साबळे तिथे थांबले. राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे पोलिसांच्या मदतीला आले. रडणारी मुलगी तिचे नाव सोनाक्षी असे सांगत होती. तिच्या हातातील पिशवी पाहिली तर त्यात वही, पेन, डबा आणि पाण्याची बाटली होती. तिला शाळेचे नाव पोलिसांनी विचारले तर ती म्हणाली बिबवेवाडी. यावरून पोलीस महापालिकेच्या शाळेत गेले. काही शिक्षकांना विचारत असतानाच सोनाक्षीला एका शिक्षिकेने ओळखले.पोलीस आणि राष्ट्रशक्तीचे पद्माकर कांबळे थेट मुख्याध्यापकांकडे गेले. शाळेच्या नोंदवहीत लिहून ठेवलेला तिच्या आईचा मोबाईल नंबर शोधून मुख्याध्यापकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या कामावरून तत्काळ परत येऊ शकत नसल्यामुळे त्यांनी सोनाक्षीला शाळेतचथांबवून घेण्यास सांगितले. संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी शाळेत येण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी सोनाक्षीच्या आईला केली. मुलीला सुखरूप शाळेत सोडल्यानंतरपोलीस आणि राष्ट्रशक्तीचेकार्यकर्ते परतले. पंरतु काळजीपोटी संध्याकाळी पावणेपाच वाजताच राष्ट्रशक्तीचे पद्माकर कांबळे वमंगेश सातंगे हे शाळेत पोहोचले. दरम्यान, त्याचवेळी सोनाक्षीचीआई दुर्गा याही शाळेत आल्याहोत्या. पद्माकर कांबळे यांनी पोलिसांना बोलावून घेतले. संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी मुलीला आईकडे सोपवले.आईच्या शोधासाठी पडली बाहेरसंभाजीनगर परिसरात राहणाऱ्या दुर्गा महाडिक शिंदे या बाणेरला खासगी कंपनीत काम करतात. गुरुवारी सकाळी कामाला जाताना सोनाक्षीला आत्याकडे सोडून त्या बाणेरला कामासाठी निघून गेल्या होत्या. काही वेळाने सोनाक्षी आईला शोधत बाहेर आली आणि थेट संभाजीनगर मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली. परत घरी जाण्याचा रस्ताच सोनाक्षीला सापडत नव्हता. त्यामुळे ती हरवली होती.