शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागेश्वराचे प्राचीन मंदिर मोजतेय अखरेच्या घटका

By admin | Updated: December 11, 2015 00:50 IST

अनेक प्राचीन वास्तूंमुळे जुन्नर तालुक्याचा नावलौकिक नेहमीच उंचावत राहिला आहे. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्राचीन वैभवसंपदा पर्यटकांना भुरळ घालणारी आहे.

मढ : अनेक प्राचीन वास्तूंमुळे जुन्नर तालुक्याचा नावलौकिक नेहमीच उंचावत राहिला आहे. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्राचीन वैभवसंपदा पर्यटकांना भुरळ घालणारी आहे. मात्र, हीच प्राचीन वैभवसंपदा काळाच्या ओघात दिवसेंदिवस नष्ट होत असून, अनेक प्राचीन वास्तू अखेरचा श्वास घेत आहेत. मढपासून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर खिरेश्वर येथे असलेले नागेश्वराचे अतिप्राचीन मंदिर दुरवस्थेमुळे सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. मंदिराच्या बाहेर वर अनेक ठिकाणी मूर्ती बसविल्याने या मूर्ती कुतूहलाने कुणाची तरी वाट पाहत आहेत, असा भास होतो. या मूर्ती मंदिर परिसरात कुठेही दिसून येत नाहीत. > सुमारे ९व्या-१०व्या शतकातील शिलाहार वंशातील निसर्गपूजक शिवभक्त झंज राजाने त्र्यंबकपासून भीमाशंकरपर्यंत एकूण १२ शिवालये बांधली. त्यांतील ३ शिवालये ही जुन्नर तालुक्यात आहेत. पारुंडे येथे मीना नदीतीरावर ब्रह्मनाथी मंदिर, कुकडी नदीच्या तीरावर कुकडेश्वर मंदिर व पुष्पावती नदीच्या तीरावर खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिर आहे. ब्रह्मनाथी व कुकडेश्वर वर्दळीच्या ठिकाणी असल्याने या मंदिरांची नेहमीच डागडुजी होते. एक संवेदनशील समाज म्हणून लोकांनी एकत्र येऊन जर खिरेश्वराचे मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न केले, तर आपल्या पुढील पिढ्यांना खिरेश्वराचे मंदिर केवळ फोटोत नाही तर खरेखुरे पाहायला मिळेल, असे जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी सांगितले.> नागेश्वराच्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर, त्या ठिकाणच्या छताला गंधर्वाच्या १६ विविध रूपांतील मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यांतून आपणास भिन्नभिन्न शक्तींचा अर्थबोध होतो. त्याचपैकी ३ मूर्ती संपुष्टात आलेल्या आहेत. याच छताच्या मधोमध पिंपळवृक्षाच्या मुळांनी मंदिरात प्रवेश केल्याने येथील एक मूर्ती तुटून नामशेष झाल्याने तेथूनच मुळांनी प्रवेश केल्याचे दिसून येते. त्याच मुळांना घंटा अडकविण्यात आलेली आहे. ही मुळे वेळीच काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केली नाही, तर पुढील काळात येथील मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही.- रमेश खरमाळे, माजी सैनिक