शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर ‘रेन हार्वेस्टिंग’ची मात्रा

By admin | Updated: January 10, 2017 03:31 IST

उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशांना करावी लागणारी भटकंती आता थांबणार आहे. राज्य सरकारने पावसाळ्यात पडणारे पाणी साठवून त्याचा पुरवठा मार्च ते

विशाल शिर्के / पुणेउन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशांना करावी लागणारी भटकंती आता थांबणार आहे. राज्य सरकारने पावसाळ्यात पडणारे पाणी साठवून त्याचा पुरवठा मार्च ते एप्रिल या काळात करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत राज्यातील ८ जिल्ह्यांतील ८९ गावांत विशेष टाक्यांची उभारणी करण्यात येणार असून, येत्या मार्चअखेरीस हा प्रकल्प मार्गी लागेल. राज्यात मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरुवात होते. डोंगर-वाड्यांतील नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी टंचाईग्रस्त गावांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५०० अथवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे अथवा वाड्या-वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे, सातारा, नगर, जळगाव, नांदेड, अमरावती, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येईल. झिंक-अ‍ॅल्युमिनियम या मिश्रधातूची टाकी येथे बसविण्यात येईल. तिला आतून विशिष्ट पद्धतीचे अस्तर असेल. त्यामुळे पावसाळ्यात साठविलेले पाणी उन्हाळ्यातदेखील वापरणे शक्य होईल. पावसाळ्यातील पाणी साठविण्यासाठी टाकीवर खास सोय करण्यात येणार आहे. याशिवाय तेथील नैसर्गिक झरे, विहिरी, बोअरवेल यांतील जास्तीचे पाणीदेखील साठवून ठेवण्याची सोय त्यात उपलब्ध असेल. या पाण्याचा वापर उन्हाळ्यातील शेवटच्या ९० दिवसांसाठी केला जाईल. या टाकीच्या जोडीला एक दिवसाचा पाणीपुरवठा करता येईल, अशी जोडटाकी असेल. या माध्यमातून पाण्याचे क्लोरिनेशनदेखील करता येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनुसार आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत ही टाकी भरण्यात येईल. दुष्काळात गावाच्या विहिरीत पाणी सोडले जाते; मात्र त्यातील बरेच झिरपून जाते. तर, अनेकदा गाळमिश्रित पाणी होते. त्यामुळे या एका टाकीचा उपयोग विविध प्रकारे पाण्याच्या साठविण्यासाठी करता येणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. गावाच्या लोकसंख्येनुसार तीन ते पाच लाख लिटर क्षमतेची ही टाकी असेल. त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गावातील महिला बचत गट अथवा शेतकरी गटासारख्या अन्य गटाकडे असेल, असेही पाटील म्हणाले.