शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅमेनिटी स्पेस’ खाजगी विकसकांना भाडेकराराने देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

पुणे : महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील अ‍ॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) ९९ वर्षांच्या कराराने खासगी विकसकांना भाडेकराराने देण्याच्या हालचाली सुरु ...

पुणे : महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील अ‍ॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) ९९ वर्षांच्या कराराने खासगी विकसकांना भाडेकराराने देण्याच्या हालचाली सुरु आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केवळ विकसकांचे हित जोपासण्यासाठी हा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी केला आहे. प्रशासनाने या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवूनच पुढील पावले टाकावीत अशी मागणी केली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाव्दारे तांबे यांनी ही मागणी केली. अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेकराराने देणे हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आणि नागरिकांना गैरसोयीचा ठरणारा आहे. पुणे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी, शहरातील सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील १२० अ‍ॅमेनिटी स्पेस खासगी विकसकांना कराराने देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यातून जे पैसे येतील, ते पुढील सहा महिन्यांतच विकासकामांच्या नावाखाली खर्च होतील. त्यामुळे हा निर्णय घाईने घेऊ नये असे तांबे यांनी म्हटले आहे.