शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क नियमन कायद्यात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

पुणे: खासगी शाळांच्या मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या शुल्‍क वसुलीला आळा घालण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या ...

पुणे: खासगी शाळांच्या मनमानी पद्धतीने आकारल्या जाणाऱ्या शुल्‍क वसुलीला आळा घालण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांकडून शुल्क विनियमन कायद्यात सुधारणा करण्यासाठी सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार राज्यातून २ हजार ८२५ सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील योग्य सूचना स्वीकारून शासनाने स्थापन केलेल्या समिती समोर सादर केल्या जाणार आहेत.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू असताना खासगी शाळांच्या अवाजवी शुल्कवाढीमुळे राज्यातील लाखो पालक व विद्यार्थी भरडले जात आहेत. त्यामुळेच खासगी शाळांची मनमानी थांबविण्यासाठी शैक्षणिक शुल्क अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान, शिक्षण विभागाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम -२०११ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम-२०१६ तसेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) अधिनियम २०१८ तयार केले. मात्र, शाळेतील शुल्काबाबत तक्रारी त्याचप्रमाणे शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याची मागणी पालकांकडून सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ५ मार्च २०२१ रोजी सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली .तसेच या कायद्यातील सुधारणेबाबत सूचना मागवल्या होत्या. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ७३४ सूचना प्राप्त झाल्या आहेत. कायद्यातील सुधारणेबाबत पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून महिन्याभरात जवळपास २ हजार ८२५ सूचना मिळाल्या आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.