शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

व्हॉट्सअॅप पोस्टवरुन खोपोलीत वातावरण तंग

By admin | Updated: March 17, 2017 19:18 IST

वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोलीमधील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनिल वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाले.

ऑनलाइन लोकमत
खोपोली, दि. 17 - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोली शहरात फिरु लागली आणि शिवप्रेमींचा संताप अनावर झाल्याने खोपोली शहरातील वातावरण तंग झाले होते. ही वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोलीमधील  केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनिल वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाल्याने, मोठ्या संख्येने शिवप्रेमीनी महाविद्यालयावर चाल करून संताप व्यक्त केला. 
 
परिस्थिती  हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महाविद्यालयात पोलिसांनी धाव घेत वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी प्राध्यापक सुनिल वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच वेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सुनिल वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
 
या बाबत मिळत असलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी सकाळ पासून , शिवाजी महाराजांच्या दोन जयंती बाबत एक वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फिरत होती.अधिक तपासानंतर सदर पोस्ट अत्यंत संताप निर्माण करणारी असून ती पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील प्राध्यापक सुनिल वाघमारे यांनी ती पोस्ट जाणीवपूर्वक टाकली असल्याचे स्पष्ट झाले.