शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्ब्युलन्स गुदमरतेय वाहतुकीच्या कोंडीत

By admin | Updated: December 28, 2016 04:21 IST

शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर होत असलेली वाहतूककोंडी आणि सामाजिक भान नसलेल्या वाहनचालकांमुळे रुग्णवाहिकांसाठी आता प्रत्येक रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’

पुणे : शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर होत असलेली वाहतूककोंडी आणि सामाजिक भान नसलेल्या वाहनचालकांमुळे रुग्णवाहिकांसाठी आता प्रत्येक रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करावे लागेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दोन रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्याचे आढळून आले. शहरात दररोज अशा अनेक रुग्णवाहिका अडकत असून, रुग्णांच्या जिवावर बेतत आहे. वाढत्या वाहनांचा भार शहरातील रस्त्यांना डोईजड होत आहे. वाहतूक पोलिसांकडून ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जातात; मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सकाळी आणि सायंकाळी शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक, सोलापूर रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन परिसर, विद्यापीठ चौक, सिमला चौक, संचेती रुग्णालय चौक, बंडगार्डन रस्ता, नेहरू रस्ता, सातारा रस्ता, सेनापती बापट रस्ता यांसह शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूककोंडी असते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत वाहनांची गर्दी सातत्याने असते. कोंडीतून वाट काढताना रुग्णवाहिका चालकांना अथक प्रयत्न करावे लागतात. सध्याची वाहतूककोंडी पाहून असाच ग्रीन कॉरिडॉर प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी करायचा का, असा प्रश्न पडतो. वाहतूककोंडीमुळे रुग्णाचा मृत्यूकोंढव्यातून पूना हॉस्पिटल येथे २ दिवसांपूर्वी ५० ते ५५ वर्षांच्या रुग्णाला नेत असताना स्वारगेट येथील कोंडीमुळे या रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले. हा रुग्ण हृदयरोगाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.