शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मांडवगण फराटा आरोग्य केंद्रात चौदाव्या वित्त आयोगातून रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

---- रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे रुग्णवाहिकाअभावी हाल झाले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार ...

----

रांजणगाव सांडस : मांडवगण फराटा (ता. शिरूर) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे रुग्णवाहिकाअभावी हाल झाले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार दिले त्याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पाठपुरावा केला आणि अखेर आज गावात रुग्णवाहिका उभी राहिली. १४ व्या वित्त आयोगातून देण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुजाता पवार यांच्या हस्ते झाले.

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याने अनेक कुटुंबं बाधित झाली. यामध्ये अनेकांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने प्राणास मुकावे लागले. त्या प्रत्येक घटनेचे वार्तांकन ‘लोकमत’ने केले.

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी पुणे जिल्हा परिषदेकडे याबाबत मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जिल्हा परिषदेच्या १४ व्या वित्त आयोग निधीतून रुग्णवाहिका मंजूर झाली होती.

मंगळवार (दि. ६) रोजी या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने वडगाव रासाई, शिरसगाव काटा, इनामगाव, पिंपळसुटी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रूक, सादलगाव, तांदळी, कुरुळी आदी गावांना रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचण्यासाठी मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी सांगितले.

या वेळी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, सभापती मोनिका हरगुडे, डॉ. मंजूषा सातपुते यांसह परिसरातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.