शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

पर्यटनात्मक विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गतीची गरज

By admin | Updated: December 22, 2016 01:58 IST

थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या

लोणावळा : थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी विद्यमान नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. लोणावळा हे शहर मुंबई, पुणे व नाशिक या तीन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यावर वसलेले असून, येथे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, लोहमार्ग असे पर्याय उपलब्ध आहेत. काही तासांमध्ये या ठिकाणी सहजरीत्या येता येत असल्याने राज्यभरातील पर्यटक लोणावळ्याला पर्यटनासाठी पसंती देतात. असे असले, तरी येथील पर्यटनस्थळांचा योग्य प्रकारे विकास झालेला नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट ही ठिकाणे सोडली, तर इतर आठ महिने पाहण्यासारखे काहीच नाही. उन्हाळयातल तर पर्यटकांना लोणावळ्यात पाहण्याजोगे एकही ठिकाण नसल्याने केवळ थंड हवा एवढेच काय ते लोणावळ्याचे महत्त्व होऊन राहिले आहे. त्यातही जी काही पर्यटनस्थळे आहेत, ती शहराच्या बाहेर ग्रामीण भागात आहेत. तेथील ग्रामपंचायतींचे उत्पन्न अगदी अल्प असल्याने त्या पर्यटनस्थळांचा विकास करू शकत नाहीत. काही ठिकाणे ही वन विभागाच्या, तर काही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचा विकास रखडला आहे. केंद्र व राज्य सरकारनेही आत्तापर्यंत लोणावळ्याच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिक्की व हॉटेलवगळता आजतरी काहीच नसल्याने पर्यटकसंख्याही कमी होऊ लागली आहे. पर्यटन व्यवसाय वाढावा याकरिता मागील काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने हद्दीत रोपवे प्रकल्प, खंडाळा व वलवण तलावात नौकाविहार, तुंगार्ली तलाव परिसरात मनोरंजन नगरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित झाल्यास आमूलाग्र बदल होईल. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.आमदार बाळा भेगडे यांनी लोणावळा व परिसराचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी दिला आहे. यात शहरासह परिसरातील ग्रामीण भाग राजमाची किल्ला, कार्ला व भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पवना धरण, लायन्स पॉइंट या परिसरांचाही समावेश केला आहे. नगर परिषद सदस्य व आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यास पर्यटनामध्ये मोठी वाढ होईल. मुख्यमंत्र्यांनीदेखील विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदारांच्या माध्यमातून सदस्य व नगराध्यक्षांनी विकासासाठी केंद्र व राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात आणावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)