शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आंबेगव्हाणकरांची परवड थांबणार

By admin | Updated: March 11, 2017 03:16 IST

आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या

ओतूर : आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांना नदीवरून आंबेगव्हाण गावाकडे येताना व जाताना लाकडी पाळण्याचा धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. येथील साकव पुलाचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला होणार आहे.आंबेगव्हाण येथील मांडवी नदीवर पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना दोरीवर बांधलेल्या पाळण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत होता. या पाळण्यातून पडून दुर्घटनाही घडल्या होत्या. विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांच्या या होरपळीबद्दल ‘लोकमत’ने दि. ३१ जुलै २०१६ रोजी ‘स्वातंत्र्यानंतरही शिक्षण अधांतरी’ या शीर्षकाखाली वृत्त दिले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व आंबेगव्हाण या गावाजवळून वाहणाऱ्या मांडवी नदीवरून लाकडी पाळण्यातून शेतकरी व विद्यार्थी कसे येतात, हे पाहण्यासाठी जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर, त्यांच्याबरोबर आमदार सोनवणे, अतुल बेनके, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी भेट दिली.त्यानंतर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्यांनी शासकीय पातळीवर साकव पुलाची नितांत गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाने या साकव पुलासाठी ९८ लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून आॅगस्ट २०१६ मध्ये या साकव पुलाच्या कामास प्रारंभ झाला. प्रारंभी नदीपात्रात ७० फूट खोलीचे खड्डे घेऊन त्यात आरसीसी पिलर टाकून त्यांच्यावर स्लॅब ओतण्यात आला. या पुलाविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते नीलेश महाले व चिंतामण घोलप म्हणाले, की या पुलाची लांबी ७४ मी, असून, रुंदी २ मी. आहे. पुलाला संरक्षक कठडे बसविले आहेत. सध्या ग्रामस्थांनी पुलाचा वापर सुरू केला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी लवकरच ग्रामस्थ बैठक बोलवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. (वार्ताहर)गेली कित्येक वर्षे आंबेगव्हाण नदी अलीकडील व पलीकडे असणाऱ्या वस्त्यांची येथे पूल व्हावा व जीवघेणा लाकडी पाळणा थांबवावा, अशी मागणी होती. पण, आता पूल झाल्यामुळे ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची सोय झाली. त्याबद्दल शासन व आमची व्यथा मांडणाऱ्या दैनिकास धन्यवाद!- नीलेश म्हात्रे,सामाजिक कार्यकर्तेआंबेगाव येथे श्री गजानन महाराज प्रसारक मंडळाची ही माध्यमिक शाळा आहे. शाळा भरण्याच्या वेळेत व सुटण्याच्या वेळेत २ शिक्षकांना जेथे पाळणा आहे त्या ठिकाणी थांबावे लागे. आता पूल झाल्यामुळे शालेय विद्यार्थी सहज आणि सुखरूप येतात आणि जातात. - माणिक बोऱ्हाडे, मुख्याध्यापक,शारदाबाई पवार विद्यालयया पुलामुळे भोरदरा, गायकरवस्ती तसेच परिसरातील गावांतून शेतमालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. यामुळे या परिसरात व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे. पावसाळ्यात दोरीच्या तरफावरून नदी ओलांडणे आता बंद होणार असल्याने आमच्या मनातील भीती दूर होणार आहे. - चिंतामण घोलप, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी