डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विचारांचा महोत्सव नावाने होणार आहे. महोत्सवाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी धनंजय कोठावळे यांची निवड झाली असून कार्याध्यक्षपदी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुरलीधर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. १८ एप्रिल २०२१ रोजी होत असलेल्या विचार महोत्सवाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे सभागृहात होणार असून उद्घाटक म्हणून भोर तालुका महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल टिळेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सुभाष वारे (ज्येष्ठ विचारवंत व अध्यक्ष एस. एम. जोशी सोशल फाउंडेशन, पुणे) यांचे ‘आंबेडकर यांचे सहकारी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या विचार महोत्सवात सहभागी होण्यासाठी लिंक पाठवली जाणार असून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. रोहिदास जाधव यांनी केले आहे.
भोरमध्ये ऑनलाइन होणार आंबेडकर जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST