शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमराठी बँक अधिकाऱ्यांमुळे खातेदारांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:27 IST

संवाद साधण्यात भाषेचा अडसर; मराठी, हिंदी भाषा प्रशिक्षण देण्याची मागणी

भिगवण : भिगवण परिसरात असणाºया राष्ट्रीयकृत बँकात काम करणाºया अधिकाºयांना मराठी भाषाच येत नसल्यामुळे सर्वसामान्य खातेदारांना याचा त्रास होत आहे. काही अधिकाºयांना तर हिंदी भाषाही समजत नसल्यामुळे सामान्य खातेदारांचा मोठा गोंधळ उठत आहे.भिगवणसारख्या ग्रामीण भागात व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बºयाच प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरमध्ये काम करणाºया बँकांनी आपली शाखा भिगवण परिसरात सुरु केलेली आहे. या बँकांचे खातेदार सर्वसामन्य नागरिक तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. तुलनेने शासकीय योजनेत नोकरी करणाºया खातेदारांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र या बँकात अधिकारी, कर्मचारी आणि शाखा अधिकारी परराज्यातून आलेला असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता अगर वाचता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भाषेची अडचण होते. बिल्ट कंपनी आवारात असणाºया बँकेत तर मराठी भाषिकाच्या तुलनेत परराज्यातील कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे तसेच त्यांना मराठीच काय हिंदीही समजत नसल्यामुळे खातेदारांना त्यांचाशी बोलताना आणि आपली अडचण सांगताना नाकी नाऊ येत असल्याचे दिसून येते. तर कॅनरा बँक तसेच बडोदा बँक आणि शेतकरी आणि शासकीय अनुदान आणि मदत मिळणाºया महाराष्ट्र बँकेतही परराज्यातील अधिकाºयांचाच भरणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मराठी भाषिक शेतकरी आणि नागरिक यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.परराज्यातील अधिकारी बोलताना ताठर भूमिका घेत असल्यामुळे काही बँकात भांडणाचे प्रकारही घडत असून असा प्रकार घडल्यास खातेदारावरच गुन्हा दाखल करण्याची भीती घातली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकेची शाखा चालू करीत असताना तसेच कार्यान्वित असणाºया बँकामध्ये मराठी भाषिक अधिकाºयाची नेमणूक करावी, अशी मागणी खातेदार करीत आहेत.बँकिंग सेक्टरमध्ये नियुक्ती होण्यासाठी आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षेत इंग्रजी भाषेचा वापर प्रामुख्याने केला जातो. परराज्यातील तरुणांचा इंग्रजी भाषेकडील कल अधिकच असतों आणि त्यामुळेच मराठी तरुणाची यातील टक्केवारी कमी प्रमाणात असते त्यामुळे इतर भाषिक तरुणांची बँकिग क्षेत्रात जास्त संख्या असल्याचे जाणकाराने सांगितले.

टॅग्स :bankबँकmarathiमराठीhindiहिंदी