शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

राजगुरूनगर शहरातील वाहतूककोंडीला होणार पर्यायी मार्ग!

By admin | Updated: March 10, 2017 04:41 IST

अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे.

राजगुरुनगर : अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे. परंतु त्याचवेळी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवर अद्याप तोडगा न निघाल्याने ठप्प आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सध्यातरी अधांतरीच राहणार आहे.राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक व प्रवासी नेहमीच त्रस्त असतात. सुटीच्या दिवशी तसेच लग्नसराईच्या काळात तर कमीत कमी दोन ते तीन तास या भागात अडकून पडावे लागते. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना दोन-दोन किलोमीटर रांगा लागतात. अनेक व्हीआयपी लोकही या वाहतूककोंडीमध्ये अडकून पडतात. रुग्णवाहिकाही या कोंडीमध्ये अडकतात. या वाहतूककोंडीला केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि खेड ते सिन्नरदरम्यान सुरू असलेले पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत राजगुरुनगरच्या पूर्वेकडून होणारे बाह्यवळण हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी केदारेश्वर येथे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केंद्रिय रस्ते निधीतून पूल मंजूर केला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर पुण्याहून राजगुरुनगर शहरामध्ये येणारी वाहने व पश्चिमेकडे वाडा परिसरात जाणारी वाहने बसस्थानकाकडे न जाता बाहेरुनच जातील, त्यामुळे वाहतूककोंडीला खूपच फरक पडणार आहे. मात्र, त्याचवेळी भूसंपादन होऊनही बाह्यवळणाच्या कामाला मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही. पूर्वेकडून जाणाऱ्या या बाह्यवळणाला चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, ढोरे-भांबूरवाडी, राजगुरुनगर व सांडभोरवाडी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शासनाने अध्यादेश काढून या जमिनींचे संपादन केले आहे. तरीही नुकसान भरपाई शासकीय दरानुसार न मिळता बाजारभावानुसार मोबदला मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आळेफाटा ते सिन्नर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे आणि टोलवसुलीही सुरू केली आहे. (वार्ताहर) पोलीस स्थानक ते गढई मैदानपोलीस स्थानक ते गढई मैदान रस्त्याच्या सुशोभीकरणादरम्यान राजगुरुनगर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला आणखी एक पर्याय पोलीस स्थानक ते गढई मैदान या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची व ओढ्यावरील पुलाची खूपच दुर्दशा झाली होती. या रस्त्याने जाताना अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागते. हुतात्मा राजगुरुवाड्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. या रस्त्याच्या कामासाठी ७९ लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून ४० लाख ७६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी भिंत बांधून हरित पट्टा, लॅण्डस्केपिंग व सुशोभीकरण केले जाणार आहे. तर रस्त्याचे काम स्थानिक निधीतून केले जाणार आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना तसेच हुतात्मा राजगुरुवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष बापू थिगळे व मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांनी सांगितले.