शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पर्यायी रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:27 IST

खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत : तीन वर्षांत काम पूर्ण करणार

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई अंतर आणखी कमी होणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी होणारा खर्च येत्या २०४५ पर्यंत टोलच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे.

द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी काही ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करून वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडून ‘मिसिंग लिंक’ नावाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागची परवानगी आवश्यक होती. केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून या रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली असल्याने प्रकल्पातील प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे.हा प्रकल्प तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील ६ कि. मी. वळणाच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपब्लध होणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांच्या सुमारे २५ मिनिटांची बचत होणार आहे.तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.रस्ता आठपदरी‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक केबल स्टे ब्रिज, खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता आणि दोन बोगदे काढले जाणार आहेत. केबल स्टे ब्रिजची लांबी ५ मीटर आणि उंची १३५ मीटर असेल.पहिला बोगदा १.६ कि. मी. आणि दुसरा १.१२ कि. मी. लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या प्रकल्पाच्या जागेपैकी ९० टक्के जागा वन विभागाची आहे, नवयुग इंजिनिअरिंग कंपनीकडून हे काम होणार आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.