शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दळणवळणासाठीचा पर्यायी रस्ता धोकादायक

By admin | Updated: January 12, 2017 01:52 IST

वासुली (ता. खेड) गावाकडे सुदुंबरे (ता. मावळ) गावाकडून येणारा रस्ता एनडीआरएफने बंद केल्याने नागरिकांचे

आंबेठाण : वासुली (ता. खेड) गावाकडे सुदुंबरे (ता. मावळ) गावाकडून येणारा रस्ता एनडीआरएफने बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दळणवळणासाठी बनविलेला पर्यायी रस्ता धोकादायक आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना जणू मृत्यूच्या सापळ्यातूनच प्रवास करावा लागत आहे.मावळ तालुक्याचे टोक असणाऱ्या सुदुंबरे गावाकडून खेड तालुक्यात प्रवेश करण्यासाठी सुदुंबरे ते वासुली असा रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जागेवर एनडीआरफने आपले बस्तान बसविले. त्यामुळे हा रस्ता साहजिकच त्यांच्या ताब्यात गेला. कालपरवापर्यंत या रस्त्याने वाहतूक आणि नागरिकांची ये-जा सुरू होती. परंतु त्यानंतर त्यांनी हा रस्ता बंद केला आणि दुसऱ्या बाजूने पर्यायी रस्ता काढून दिला.परंतु हा काढून दिलेला पर्यायी रस्ता धोकादायक असून एका बाजूने संरक्षक भिंत आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र खोल दरीसारखा तीव्र उताराचा भाग असल्याने प्रवास करताना नागरिकांचे डोळे फिरतात. ज्या बाजूला खोल दरीसारखा भाग आहे, त्या बाजूला खोलगट भागात मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. त्यामुळे हा रस्त्याच्या कडेचा भाग अतिशय तीव्र उताराचा बनला आहे. याशिवाय या मार्गावर असणारी आरसीसी मोरीदेखील खोदाई केल्याने सध्या तरंगत्या स्वरूपात आहे. मोरीच्या खालच्या बाजूला खोदाई केल्याने मोरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या ठिकाणी तीव्र वळण आणि उताराचा भाग असल्याने प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.(वार्ताहर)जीव धोक्यात घालून प्रवास हा पर्यायी रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्याने त्यावर दगड-गोट्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सुदुंबरे येथे शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, याशिवाय पिंपरी-चिंचवड या भागात कामासाठी जाणारे चाकरमानी, दूधव्यवसाय करणारे नागरिक यांचा या मार्गाचा मोठा वापर असल्याने सध्या त्यांची गैरसोय होत आहे. जरी या बाजूने रस्ता काढून दिला असला तरी प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो सुरक्षित असणे अतिशय गरजेचा आहे, अशी या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची अपेक्षा आहे.