शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीसोबतच फेररचनाही कळणार

By admin | Updated: October 5, 2016 01:45 IST

जिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल

सुषमा नेहरकर-शिंदे , पुणेजिल्हा परिषदेच्या गट-गणांची फेररचना अधिकृतरित्या १० आॅक्टोबर रोजी जाहीर होणार असली, तरी आरक्षण सोडत काढताना प्रशासनाला प्रत्येक गट-गणाचा नकाशा प्रसिद्ध करावा लागेल. त्यामुळे सोडतीसोबतच बुधवारीच (दि. ५) इच्छुकांना फेररचनादेखील कळणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये कोणाचे गट-गण जाणार व कोणाचे राजकीय भवितव्य टांगणीला लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणांची आरक्षण सोडत बुधवारी एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये काढण्यात येईल. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ७५ गटांची आरक्षण सोडत दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. गटांचे आरक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार निवडणुका होत असल्याने गट-गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात गट-गणांची फेररचना नक्की कशी झाली, हे प्रथम कळणे अपेक्षित होते. परंतु, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अगोदर आरक्षण सोडत अन् नंतर फेररचना जाहीर करण्यात येणार आहे.गट-गणांची आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार असून, त्यासाठी सन २००२, २००७ आणि २०१२चे आरक्षण गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे मागील ३ निवडणुकांत टाकण्यात आलेली आरक्षणे वगळून गट-गणांवर आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, या वेळी गट-गणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. सन २०११च्या लोकसंख्येनुसार जुन्नर, भोर, दौंड आणि बारामती या तालुक्यांत प्रत्येकी एक गट कमी झाला आहे. तर, एकट्या हवेली तालुक्यात तब्बल तीन गटांची व शिरूर तालुक्यात एका गटाची नव्याने निर्मिती झाली आहे. नव्याने निर्माण झालेल्या गट-गणांमध्ये पूर्वीच्या गट-गणांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याने जुने आरक्षण गृहीत धरून चक्राकार आरक्षण टाकण्यात येणार आहे. परंतु, एखाद्या गट-गणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या नव्याने आली असल्यास येथे फ्रेश (प्रथमच) आरक्षण टाकण्यात येणार आहे. ही आरक्षणे जाहीर करीत असताना प्रत्येक गट-गणाची माहिती व नकाशा जाहीर करण्यात येईल.