शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

महाविद्यालयांमध्ये जल्लोषात गुणपत्रिकांचे वाटप

By admin | Updated: June 10, 2017 02:14 IST

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद.... पालकांच्या डोळ्यांत पाल्याबद्दल झळकणारे कौैतुक.. मित्र-मैत्रिणींकडून होणारा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद.... पालकांच्या डोळ्यांत पाल्याबद्दल झळकणारे कौैतुक.. मित्र-मैत्रिणींकडून होणारा अभिनंदनाचा वर्षाव अशा वातावरणात विविध महाविद्यालयांत बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले.बारावीचा आॅनलाईन निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने महाविद्यालयात आले; त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. निकालाच्या आनंदाने महाविद्यालयांचा परिसर फुलून गेला होता. फर्ग्युसन, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयांसह अनेक महाविद्यालयांमध्ये बारावीत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचा निकाल ९९ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.१९ टक्के लागला. फर्ग्युसन महाविद्यालयात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे संचालक राम निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, उपप्राचार्य महादेव हाके यांची उपस्थिती होती. बीएमसीसी महाविद्यालयात १२वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जे.आर.व्ही.जी.पी.चे संचालक श्रीकृष्ण कानेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, उपप्राचार्य डॉ. सी. एम. नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुणगौैरव सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त केले. शिक्षकांची शिकविण्याची सहजसोपी पद्धत, पालकांचा पाठिंबा, कॉलेजकडून मिळालेले प्रोत्साहन आणि नियमित अभ्यास यांमुळे परीक्षेत यश मिळाल्याच्या भावना गुणवंतांनी व्यक्त केल्या.