शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

क्रिकेटच्या मैदानावर आघाडी विरुद्ध युती!

By admin | Updated: January 14, 2017 03:24 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अद्याप आघाडी, युतीबाबात कोणतेही संकेत नाहीत. मात्र, क्रिकेटच्या सामन्यासाठी

कोरेगाव भीमा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अद्याप आघाडी, युतीबाबात कोणतेही संकेत नाहीत. मात्र, क्रिकेटच्या सामन्यासाठी तरी ती झाली आहे. निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ‘पीटीपीएल २०१७’ या स्पर्धेत शनिवारी पाहावयास मिळणार आहे. राष्ट्रवादी-काँगेस पदाधिकारी विरुद्ध शिवसेना-भाजप पदाधिकरी यांच्यात हा सामना रंगणार असल्याने कोण कोणाची विकेट काढतोय की कोण कोणाचा धुव्वा उडवतोय, हे या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी पुणे महापालिकेचीही निवडणूक असणार असल्याने राष्ट्रवादी-काँगेस, शिवसेना-भाजप व इतर पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पै. संदीप भोंडवे यांनी आयोजित केलेल्या खांदवेनगर लोहगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पार पडणाऱ्या ‘पीटीपीएल २०१७’ या पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रिमीयर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी राष्ट्रवादी-काँगेस मित्रपक्ष व शिवसेना-भाजप मित्रपक्षांमध्ये राजकीय आखाड्याची रंगीत तालीम म्हणून मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.राष्ट्रवादी-काँग्रेस, मित्रपक्ष व शिवसेना-भाजपा मित्रपक्षांमध्ये होणाऱ्या या सामन्यात शिवसेना-भाजपा संघात आमदार महेश लांडगे, जगदीश मुळीक, राहुल कुल, विनायक निम्हण, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल, कुलदीप कोंडे, राम गावडे, सुनील टिंगरे, राजेंद्र पायगुडे, प्रीतम खांदवे, सतीश पाबळे, महेश शिंदे, सचिन पलांडे, सचिन शितोळे तर राष्ट्रवादी-काँग्रेस संघात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, योगेश जगताप, बाबा कंधारे, रोहित टिळक, प्रवीण माने, मानसिंग पाचुंदकर, महेंद्र पठारे, सुनील शितोळे, सुनील वागस्कर, संतोष कुंजीर, रवींद्र कंद, मोहन तापकीर, यशवंत पाचंगे आदींचा समावेश असल्याचे पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)