शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कथित गुरू येमूलची जामिनावर मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “बायकोचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही,” असा सल्ला देऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “बायकोचे पायगुण चांगले नाहीत, तिच्यामुळे तू आमदार, मंत्री होऊ शकणार नाही,” असा सल्ला देऊन धनिक कुटुंबातील सुनेच्या छळास कारणीभूत ठरलेला कथित गुरू रघुनाथ येमूल याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर मंगळवारी (दि. १३) येमूलला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि. १४) येमूलच्या अर्जावर सुनावणी घेऊन त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रघुनाथ राजाराम येमूल (४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) याच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ४९८(अ), ३९२, ३५४, ३२६(अ), ३२३, ३२५, ४०६, ४२०, १२०(ब), ५०६ सह ३४ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याच्या समूळ उच्चाटनासाठी अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

चेन्नईच्या एका तांत्रिकाशी रघुनाथ येमूलने गणेश गायकवाड याची ओळख करून दिली होती. येमूल हा हस्तरेषातज्ज्ञ आहे. त्याची प्रमाणपत्र जमा करायची आहेत. त्याच्याबाबत आणखी कुणाची तक्रार असेल तर समोर येण्याचे आम्ही आवाहन केले आहे. त्याचा तपास करायचा आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीमध्ये तीन दिवस वाढ करण्याची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांना केली. मात्र, चोवीस तासांत एकही तक्रारदार समोर आलेला नाही. कुणी तक्रारदार पुढे आल्यास येमूल याला पुन्हा पोलीस कोठडी देता येऊ शकते असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. प्रताप परदेशी आणि कीर्ती गुजर यांनी केला. तो मान्य करीत न्यायालयाने येमूलला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. येमूलविरुद्ध फिर्यादीत तसेच पुरवणी जबाबातही उल्लेख नसून त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नाही, हा ॲड. परदेशी व गुजर यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.