शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकास करणारे शिक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:14 IST

लोकसंख्या वाढत असताना दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकास करणारे संस्कारक्षम शिक्षण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुणे : लोकसंख्या वाढत असताना दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी पालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुलांना पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच मानसिक, शारीरिक विकास करणारे संस्कारक्षम शिक्षण मिळाले तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.शिक्षण प्रसारक मंडळींच्या १३० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी एस. पी. एम. पब्लिक स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या टेबल टेनिस हॉलचे उद्घाटनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, विश्वस्त अशोक वझे, आमदार माधुरी मिसाळ, जयंत किराड, सतीश पवार, एस. पी. एम. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती मॉरिस आदी उपस्थित होते.बापट म्हणाले, आज शिक्षणाचे बाजारीकरण होत चालले आहे. मात्र, हे बाजारीकरण न करता चांगल्या संस्कराचे शिक्षण देणाºया काही शिक्षणसंस्था आजही महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे नाव आदराने घ्यावे लागेल.डॉ. करमळकर म्हणाले, नीतिमूल्ये व संस्काराची व्यवस्था ढासळत चालली आहे. पण आजही शिक्षणाचा दर्जा आणि गुणवतेला महत्त्व देणाºया जुन्या संस्था पुण्यात आहेत. या संस्थांच्या कामाची पाहणी करणे नेहमी आवडते. त्यामुळे चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.संस्थेचे अध्यक्ष जैन यांनी भाषणात संस्थेच्या यशस्वी वाटचालीविषयी सांगितले. वझे यांनी प्रास्ताविक केले. चितळे यांनी आभार मानले.