शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णालयांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसची मागणी बारामती : कोरोना कोविड १९ व इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना ...

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसची मागणी

बारामती : कोरोना कोविड १९ व इतर रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचार करावेत. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. याबाबत बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी संबंधित अंगीकृत रुग्णालये व संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक लावण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी बारामती व इंदापूर तालुक्यातील सद्यस्थिती सांगून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे दाखवून दिले. एन.डी.एम.जे संघटनेचे विधी सल्लागार अ‍ॅड. अमोल सोनवणे यांनी सर्व कायदेशीर बाबी शासन निर्णय, अधिसूचना व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील बारकावे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या निदर्शनास आणले.

प्रांताधिकारी कांबळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

या वेळी पुणे जिल्हा निरीक्षक धनाजी गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव धाईंजे,तालुका सचिव शिवाजी बनसोडे, अनिल बगाव,अतुल बनसोड,नवनाथ भागवत, प्रणव भागवत हे उपस्थित होते.

————————————————

फोटो ओळी : प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने निवेदन देताना कार्यकर्ते.

१६०७२०२१-बारामती-१४