शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरच्या उपनगराध्यक्षपदी अलका फुलपगार

By admin | Updated: January 11, 2017 02:15 IST

जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अलका फुलपगार निवडून आल्या.

जुन्नर : जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या अलका फुलपगार निवडून आल्या. त्यांनी आपला माणूस आपली आघाडी व भाजपा यांच्या संयुक्त आघाडीच्या उमेदवार कविता गुंजाळ यांचा ३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षपद व ५ नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलकाताई फुलपगार यांचा एकमेव यांनी अर्ज दाखल दाखल झाला होता, तर आघाडीकडून कविता गुंजाळ यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे ८  नगरसेवक होते. भाजप व  आपल्या आघाडीचे व काँग्रेसचे ४ नगरसेवक होते.खुल्या पद्धतीने हात वर करून झालेल्या मतदानात अलकाताई फुलपगार यांनी कविता गुंजाळ यांचा ७ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचे शहरप्रमुख अविनाश करडिले व राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन गांधी बिनविरोध निवडून आले.या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी नितीन गांधी यांचे तर शिवसेनेचे गटनेते दीपेश परदेशी यांनी अविनाश करडिले यांच्या नावाची शिफारस पत्राद्वारे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्याकडे केली.शिवसेनेचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक आविन फुलपगार, समीर भगत, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, माजी नगरसेवक श्याम खोत या वेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे, नगरसेवक फिरोज पठाण, अक्षय मांडवे, नगरसेविका अलकाताई फुलपगार, समीना शेख, वैष्णवी गवळी, मोनाली म्हस्के, बाजार समितीचे संचालक धनेश संचेती, धनराज खोत, अशोक लुणावत आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर पालिका सभागृहात त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.या वेळी नगराध्यक्ष श्याम पांडे, माऊली खंडांगळे, दिनेश दुबे, दीपेश परदेशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. फिरोज पठाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)जुन्नरकर जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. नगरपालिकेचा कारभार करताना विकासकामांच्या बाबतीत कोणतेही राजकारण करणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करू.- अलका फुलपगार, उपनगराध्यक्षशिवसेना, राष्ट्रवादीची अभद्र युती : सोनवणे जुन्नर : उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने संगनमताने ठरवून शिवसेनेचे नगरसेवक जाणीवपूर्वक तटस्थ राहिले.उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या डावपेचाचा तो भाग होता. मागील सत्ता काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या भ्रष्ट कारभारावर पांघरून घालण्यासाठी त्यांची अभद्र युती करण्यात आलेली आहे, अशी टीका आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे पत्रकार परिषदेत केली. मतदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विकासाचे मॉडेलच्या प्रस्तावाचे काम श्मार्गी लावणार असल्याचे आमदार सोनवणे यांनी संगीतले. (वार्ताहर)