शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींना पायथ्याला रोखले

By admin | Updated: January 1, 2015 01:11 IST

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी खडकवासला - सिंंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यंदा पोलीस, वनविभाग व शिवप्रेमी संघटनांकडून सिंंहगड पायथा परिसरात रोखले.

खडकवासला : नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी खडकवासला - सिंंहगड परिसरात पर्यटकांची गर्दी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यंदा पोलीस, वनविभाग व शिवप्रेमी संघटनांकडून सिंंहगड पायथा परिसरात रोखले. सकाळपासूनच शहर परिसरात व गडावर धुके होते. तसेच, हवेत कमालीचा गारवा जाणवत होता, तर अधूनमधून या परिसरातील वातावरण ढगाळ होत असल्यानेच पर्यटकांचे प्रमाण काहीसे कमीच होते. शहराचे उपनगर परिसरातही असेच वातावरण असल्यामुळेच कदाचित पुणेकरांकडून आजच्या दिवशी सिंंहगड, खडकवासला व पानशेत या पर्यटनस्थळांकडे पाऊले वळत नव्हती. दुपारनंतर काही प्रमाणात सिंंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढली होती; मात्र नेहमीपेक्षा गर्दीचे प्रमाण कमीच जाणवत होते. सिंंहगडाच्या पायथ्याला वनसंरक्षण समितीच्या उपद्रवशुल्क नाक्यावर घेरा सिंंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक, वनकर्मचारी, पोलीस, सिंंहगड पावित्र्य मोहीम, राजे शिवराय प्रतिष्ठान, शिवसेना, युवासेनेचे कार्यकर्त्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती.जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या, सिगारेट, तंबाखू व गुटखा लगेचच नष्ट करण्यात येत होता. (वार्ताहर)१ हवेली पोलिसांकडून खडकवासला, सिंंहगड परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खडकवासला, नांदेड, डोणजे व सिंंहगड पायथ्याला वाहनांची तपासणी केली जात होती. २ सिंंहगड येथे वनपरिक्षेत्र अधिकारी जहागीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल प्रभाकर कड, एम. पी. धुमाळ, वनरक्षक जी. एम. सरोदे, एम. एम. चव्हाण, विद्या पवार, संदीप कोळी व इतर वनकर्मचारी हे वनसंरक्षण समितीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सिंंहगड घाट व वनपरिसरात गस्त घालून कोणालाही दारू पिऊन दंगामस्ती करून देत नव्हते. ३ तपासणी मोहिमेत सरपंच गुलाब थोपटे, युवासेनेचे सचिन पासलकर, माजी सरपंच विजय कोल्हे, नंदकिशोर मते, संतोष गोपाळ, अनिकेत देशमुख, प्रवीण पायगुडे, सुशांत खिरीड, कुंडलिक खिरीड, अनिल जाधव, अनंता थोपटे हे सहभागी झाले होते. ४ आज सिंंहगडावर ५६१ दुचाकी व २६३ वाहने उपद्रवशुल्क घेऊन गडावर गेली होती. त्यांच्याकडून वनसंरक्षण समितीने २५ हजार ७७० रुपये उपद्रवशुल्क जमा केले. तर, आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला.