शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीचा विकास रखडला

By admin | Updated: May 25, 2015 05:48 IST

आळंदीसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुमारे २१८ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला; परंतु यापैकी आत्तापर्यंत फक्त २३ कोटींचीच कामे

आळंदी : आळंदीसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुमारे २१८ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला; परंतु यापैकी आत्तापर्यंत फक्त २३ कोटींचीच कामे पूर्ण झाली आहेत, तर ९८ कोटींची कामे सुरू आहेत. ९७ कोटींच्या कामांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. खर्च झालेल्या निधीपैकी बहुतांश निधी हा ठेकेदारांना अनामत रक्कम देण्यातच गेला आहे. ज्यांनी हा निधी अनामत म्हणून उचलला त्यांनी काम अर्धवट अवस्थेत सोडले, तर काही कामे पूर्ण झालेली आहेत. जी पूर्ण झाली, त्याची केवळ देखभाल व्यवस्थितपणे न झाल्यामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. शासनाने २०११ पासून सुमारे २१८ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र योग्य नियोजनाचा अभाव, रखडलेली भूसंपादन प्रक्रिया, हितसंबंध, टक्केवारीचे राजकारण या एकूणच प्रक्रियेत आलेला हा निधी खर्च होऊ शकला नाही. परिणामी तब्बल ९७ कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी खर्चाअभावी पडून राहिला आहे.इंद्रायणी नदीवरील चऱ्होली खुर्द येथील १२ मीटर रुंदीचा पूल तयार करण्यात आला असला, तरी त्या वरील जोड रस्त्याचे काम अपूर्ण व अर्धवट अवस्थेतच आहे. चऱ्होली पूल व आळंदी-मरकळ रोड यांना जोडणारा १८ मीटर रुंदीचा व २ किमी लांबीचा बाह्यवळण रस्ता शेतकऱ्यांच्या विरोध, विद्युतखांबांचे स्थलांतर आदीमुळे रखडले आहे. चाकण चौक ते सिद्धबेट हा १००० बाय ९ मीटरचा रस्ता भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली नाही म्हणून प्रलंबित आहे.मंजूर कामांपैकी जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधणे हा १०० बाय १२ मीटरचा पूल तेवढा पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला आहे; मात्र गोपाळपुरा घाट ते दक्षिणेस इंद्रायणी नगरकडे जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर लोखंडी पूल बांधणे व पुलाच्या दक्षिण बाजूस तीरावर घाट बांधणे, भक्ती सोपान सेतूचे मजबुतीकरण करणे, वाहनतळांपैकी पुणे-आळंदी रस्त्यावरील नदीकाठचा भाग, चाकण चौकातील आरक्षण अद्यापही ताब्यात घेता आले नाही. वडगाव-आळंदी रस्ता, नदीपात्रालगतचा आळंदी रस्ता, पुणे-आळंदी रस्ता, न. प. कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी, हेलिपॅड तयार करणे, ही कामे अंदाजपत्रकाअभावी, तर काही जागा निश्चिती व अन्य कारणास्तव प्रलंबित आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या सोयीसाठी अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांचे मजबुतीकरण करण्यासाठी तब्बल ८.२९ कोटी खर्च केले. यात १४ शौचालयांचे काम पूर्ण झाले; मात्र यातील अनेक शौचालयांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची सोय नाही, म्हणून ती वापराविना कुलूपबंद अवस्थेत आहेत. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस आॅर्गनायझेशन संस्थेंतर्गत तब्बल १६ कोटींचा खर्च करून शाळा क्र.१च्या आवारात भव्य शौचालये उभारण्यात आली आहेत, तर एका इमारतीचे काम चालू आहे. एकूण १७ ठिकाणी शौचालये बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र नियोजनाप्रमाणे ती बांधली नाहीत. मंजूर जागा एका ठिकाणी, तर बांधकाम दुसऱ्या ठिकाणी, अशी अवस्था केली आहे. सुजल निर्मल अभियान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शुद्ध पाण्यासाठी तडफडणाऱ्या आळंदीकरांना लवकर पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तब्बल २२ कोटींचा हा प्रकल्प शासनाने मंजूर केला; मात्र २०१३ पासून या प्रकल्पाचे संथगतीने काम सुरू आहे. सिद्धबंद स्थळाचा विकास, पार्किंग, उद्यान, पर्णकुटी, प्रसादालय, ध्यानमंदिर, स्मारक, माउली सृष्टी या कामांचा कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नाही. इंद्रायणी तीरावरील नदीपात्रालगतच्या भिंतीचे काम पूर्ण झाले असले, तरी इतर कामांकडे दुर्लक्ष झाले आहे.