शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत वैष्णवांचा मेळा

By admin | Updated: November 19, 2014 04:35 IST

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी एकादशीला आज साडेतीन लाखांहून अधिक वैष्णवांचा महामेळा अलंकापुरीत भरला आहे

आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या ७१८व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी एकादशीला आज साडेतीन लाखांहून अधिक वैष्णवांचा महामेळा अलंकापुरीत भरला आहे. आज (मंगळवारी) कार्तिकी एकादशीनिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करून लाखो भाविकांनी ज्ञानदेवांच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घेतले. पालखी नगर प्रदक्षिणेवेळी गर्दीने उच्चांक गाठला. नगरप्रदक्षिणामार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, अजान वृक्ष, सिद्धेश्वर सुवर्ण पिंपळ, एकनाथ पार, पुंडलिकाचे देऊळ, नृसिंह सरस्वतीमहाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, चांगदेव भिंत, साईबाबा मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होती.महानैवेद्यानंतर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याची सजावट व पोशाख परिधान करण्यात आला. चोपदारांच्या नेतृत्वाखाली व हैबतबाबांच्या दिंडीतर्फे दुपारी दीडच्या सुमारास माऊलींची पालखी सजविलेल्या रथातून मंदिर व नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडली. त्या वेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिमंदिरापासून फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे निघालेला सोहळा हजेरी मारुतीजवळ येऊन काही वेळापुरता विसावला. या ठिकाणी सर्व दिंड्यावाल्यांची हजेरी घेऊन अभंग सादर करून सोहळा पुढे मार्गस्थ झाला. आजोळ घरासमोरून विष्णू मंदिराशेजारून इंद्रायणी घाटाकडून सायंकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहचला. वीणामंडपात आरती घेऊन माऊलींच्या पादुकांना शेजघरामध्ये स्थापन करण्यात आले. नगरप्रदक्षिणेदरम्यान पालखीतील माऊलींच्या मुखवट््याचे दर्शन घेण्यासाठी वारकरी येत होते. पालखी मंदिरात विसावल्यानंतर देवस्थानच्या वतीने मानकरी तसेच दिंड्याकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी दर्शनबारी खुली करण्यात आली. रात्री दहापासून मोझेकरांचा जागराचा कार्यक्रम झाला. खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते द्वादशीची शासकीय पहाटपूजा करण्यात आली.