शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांच्या नशिबी मैलामिश्रित पाणी

By admin | Updated: April 27, 2017 04:48 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील जलशुद्धीकरण केंद्राला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावतीर्थक्षेत्र आळंदीतील जलशुद्धीकरण केंद्राला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. तसेच मागील काही महिन्यांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना गढूळ मैलामिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी वितरित केलेल्या पाण्याचा वापर नागरिकांना इतर वापरासाठी करावा लागत आहे. भाविकांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून हक्काचे स्वच्छ पाणी वितरीत करण्याची वारंवार मागणी करूनही नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्याच्या मशनिरी जुनाट झाल्या आहेत. परिणामी सांडपाणी मिश्रीत टाकीत आलेले पाणी पूर्ण क्षमतेने शुध्द होत नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात नळाद्वारे मलमिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकही जलशुद्धीकरण केंद्रातून मिळालेल्या पाण्याचा वापर टाळण्यास पसंती देत आहेत. देवस्थानच्या विहिरीतून किंवा हवेली हद्दीतून ड्रमच्या साह्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात - लवकर जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.