शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला दररोज दोन लाख लिटर शुद्ध पाणी

By admin | Updated: May 11, 2017 04:23 IST

तीर्थक्षेत्र आळंदीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन-तीन दिवसांपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आळंदीकरांची शुद्ध पाण्याची दीर्घ प्रतीक्षा अखेर मार्गी लागली आहे.गेल्या काही महिन्यांपासून आळंदी शहरात पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा केला जात होता. वास्तविक पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रसायन, तसेच मैलामिश्रीत पाणी थेट इंद्रायणीत सोडले जात असल्यामुळे नदीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत होते. हेच दूषित पाणी पुढे प्रवाहित होऊन आळंदीतील बंधाऱ्यामध्ये येते. नगर परिषद जलशुद्धीकरण केंद्रामार्फत या पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी आळंदीकरांना पिण्यासाठी पुरवठा करते. मात्र, येथील पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे हे पाणी स्वच्छ होण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आळंदीकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी आळंदी नगर परिषदेने लेखी पत्राद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आळंदीतील नदीतील पाण्याची, तसेच जलवाहिन्यांची पाहणी करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, या निर्णयासाठी बुधवारी (दि. १०) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्याव्यतिरिक्त शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पिण्यासाठी चऱ्होली जलवाहिनीद्वारे दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, शहर सहअभियंता रवींद्र दुधेकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.