शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्डीत आज समस्यांचा जागर

By admin | Updated: February 9, 2015 04:02 IST

रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात

पिंपरी : रखडलेल्या योजना, प्रकल्प, विकासाकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम आकुर्डी गावठाण प्रभागात सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.‘पिंपरी चिंचवडचा ऱ्हास आता बास’ ही विशेष मोहीम ‘लोकमत’ने सुरू केली आहे. यातून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जनतेसमोर आणून चर्चा घडविली जात आहे. सामान्य नागरिक, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशी चर्चा या उपक्रमातून घडवून आणली जाते. प्रश्न, समस्यावरील चर्चा व त्याचे निराकरण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ हा पहिला उपक्रम चिंचवडमध्ये राबविण्यात आला. त्यानंतर मोरवाडी, पिंपरी, कृष्णानगर, शाहूनगर, संभाजीनगर, केशवनगर, भोसरी, चऱ्होली या प्रभागात राबविण्यात आला. त्यास मोठा प्रतिसादमिळाला. या उपक्रमांच्या माध्यमातून नागरी प्रश्न सोडविले जात असल्याने नागरिकांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेल्या आकुर्डी गावठाण प्रभागात (प्रभाग १६) कामगार, कष्टकरी, उच्च, मध्यमवर्गीय नागरीक वास्तव्यास आहे. या परिसरात अजूनही गावपण टिकून आहे. गावजत्रा, ग्रामदैवत खंडेराय उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. एकात्मकतेचे दर्शन विविध उपक्रमांमधून दिसत असते. या भागातील नागरी प्रश्नावर चर्चा घडावी, प्रश्न सुटावेत, याच उद्देशाने पांढारकर सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी’चे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक निलेश पांढरकर, नगरसेविका प्रतीभा भालेराव यांच्यासह प्रभागस्तरावरील अधिकारी सहभागी होत आहेत. त्यांच्यासमोर पदपथावरील अतिक्रमणे, रोडरोमीयोंचा त्रास, अरूंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, खोदलेले रस्ते, पांडूरंगबुवा काळभोर सभागृह परिसरातील गाळ्यांचे गायब झालेल्या शटर्स, पंचतारानगर परिसरातील कचराकुंड्या, नाल्यांमध्ये साचलेला राडारोडा, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नावर सामान्य नागरिकांना मते मांडता येणार आहे. या प्रश्नावर चर्चा घडवून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)