शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना उभे करणारे राजकारणातील राजहंस "अजितदादा पवार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

सत्ता असताना कधी अहंकार नाही आणि सत्ता नसताना कधी चिडचीड देखील नाही. हा राजकारणातील दुर्मिळ गुण दादांकडे आहे. ...

सत्ता असताना कधी अहंकार नाही आणि सत्ता नसताना कधी चिडचीड देखील नाही. हा राजकारणातील दुर्मिळ गुण दादांकडे आहे. त्यामुळे दादा हे राजकारणातील राजहंस आहेत. प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्याऐवजी आपण घेतलेले जनहिताचे निर्णय जनतेसमोर ठेवून जनतेच्या कामात रमणे हा देखील एक महत्वाचा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो.

जगाच्या कानाकोपऱ्यातील विविध देशातील अत्याधुनिक सोयी सुविधांचा अभ्यास करून त्या आपल्या राज्यात राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा कर्तबगार नेता म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. दादांनी उद्योगनगरी पिंपरी - चिंचवड किंवा बारामती यशस्वीपणे उभारून महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारत देशासमोर रोल मॉडेल उभा केले आहे. लोकांना सतत भेटणारा, कर्तव्य कठोर, घेतलेल्या खात्याच्या कारभारामध्ये कार्यक्षमतेची, आधुनिकतेची जोड देऊन पारदर्शी कारभार करणारा ताकदवान मंत्री म्हणून दादांकडे पाहिले जाते.

सन २०१४ पासून आर्थिक रुळावरून घसरलेली राज्याची गाडी पूर्वपदावर आणत असताना कोरोना सारख्या महाभयंकर काळात न डगमगता राज्याची आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळत सर्वसामान्यांना उभा करण्याचा प्रयत्न करणारा कष्टाळू मंत्री म्हणून दादांकडे पाहिले जाते. चांगल्या कामात होकार भरणारा आणि लोकोपयोगी नसलेल्या कामांना स्पष्ट नकार देणारा राजकारणातील दुर्मिळगुण त्यांच्यामध्येच दिसतो. काम छोटे असो की मोठे प्रत्येक कामात उच्च गुणवत्ता, उत्तम दर्जा आणि जनतेसाठी उपयुक्तता या बाबींचा आग्रह धरणारा नेता म्हणजे अजितदादा होय.

दादांची स्वच्छ प्रतिमा आणि कारभार यामुळे रोज कितीही आरोप झाले तरी विरोधकांना ते कधीही सिद्ध करता आले नाहीत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेती अथवा सहकारातील जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवताना त्याला आवश्यक तेवढी ताकद देण्याचा त्यांचा स्वभावगुण, प्रशासनावर असलेली पकड, वेळेला अत्यंत महत्व, रोकठोक बोलणे, कामाचा प्रचंड आवाका, दुरदृष्टी, निर्णयक्षमता ही अजितदादांची बलस्थाने आहेत.

प्रशासनाला शिस्त हवीच त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील शिस्त हवी म्हणून वेळप्रसंगी कठोर वागणारा हा नेता असल्याने त्यामुळे विकासाचे चांगले नियोजन होते. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. कार्यकर्त्यांची जवळीक, त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, अडीअडचाणीच्या वेळी अगदी अनपेक्षित टोकाची मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे दादा कायमकार्यकर्त्यांच्याबगराड्यात असतात. आपल्या सोबतचा कार्यकर्ताहीमोठा झाला पाहिजे अशी त्यांची भावना हेच त्यांच्या यशाचे गमक मानावे लागेल. अत्यंत कठोर असणारे दादा खूप हळवे, खूप संवेदनशील देखील आहेत. परंतु तो त्यांचा गुणठराविक कार्यकर्त्यांनाच माहित आहे.

आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचे बाळकडू आणि सततचे मार्गदर्शनच मा. अजितदादांना आगामी काळात यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. त्यातूनच उभ्या महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व लाभेल असा आत्मविश्वास वाटतो. यातूनच तुमच्या आमच्या मनातला महाराष्ट्र उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल. सर्वच क्षेत्रात आपले दादापण जगणाऱ्या नामदार अजितदादांना ६२ वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन प्रदीर्घ व्यक्तिगत आणि राजकीय वाटचालीस खूप खुप शुभेच्छा...!

--

प्रदिप गारटकर.

पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी