शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्या आदेशाला ‘अक्षता’

By admin | Updated: June 17, 2016 05:18 IST

‘राज्य किंवा केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात रस्त्यावर उतरा, प्रखर विरोध करा, आक्रमक बना, निदर्शने करा, असा आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना

पिंपरी : ‘राज्य किंवा केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात रस्त्यावर उतरा, प्रखर विरोध करा, आक्रमक बना, निदर्शने करा, असा आदेश माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यास पन्नासही पदाधिकारी उपस्थित नव्हते. ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ अशी अवस्था स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची झाली आहे. एकमुखी सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीने केवळ दिखाऊपणासाठीच आंदोलन केल्याची टीका होत आहे. आकुर्डी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बंडखोरीवर भाष्य केले होते. तसेच पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, केंद्र व राज्य सरकारने राबविलेली चुकीची धोरणे यांचा निषेध तातडीने करा, तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक बना, असे आवाहन केले होते. त्यानुसार शहर राष्ट्रवादीने आज वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांची दांडी - महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८२ नगरसेवक आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांचे सभापती, प्रभागाध्यक्ष हे राष्ट्रवादीचेच आहेत. शिक्षण मंडळावरही आठ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. मुख्य पदाधिकारी वगळता अन्य नगरसेवक आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे आंदोलन केवळ दिखाऊपणासाठीच तर केले नसावे ना, अशी टीका होत आहे.