या वेळी अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा ढवळे त्यांच्या हस्ते या वेळी कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रुट्स, सॅनिटायझर, साबण आणि प्रत्येकाला एक वाफेचे मशीन देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
पालिका आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, अपंग संघटनेचे संभाजी महामुनी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी आपले विचार मांडत मंडळाच्या या गौरवाचे कौतुक केले. अमक्या एका दवाखान्यात व्यक्ती मयत झाली आहे तयारीला लागा, असे नेहमी फोन येत असताना तुमचा मंडळाकडून सत्कार करावयाचा आहे, असा फोन आला ही आमच्यासाठी खूप मोठी बाब असल्याची भावना सत्कार झालेल्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ मांडली. मंडळाचे संजय उबाळे, अतुल जंगम, नंदू गिते, जयवंत धुमाळ, कृष्णा पवार आदी कार्यकर्त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कोरोना नियम पाळत संयोजन केले.
सासवड येथील अजय मंडळाच्या वतीने पालिका कर्मचाऱ्यांना वस्तू वाटप करण्यात आल्या.