शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘नो एंट्री’ची ऐशी-तैशी

By admin | Updated: May 12, 2016 01:24 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था समस्येबाबत वारंवार प्रशासकीय स्तरावर बैठका होऊनदेखील त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘नो एंट्री’ फलक लावले

बारामती : शहरातील वाहतूक व्यवस्था समस्येबाबत वारंवार प्रशासकीय स्तरावर बैठका होऊनदेखील त्यामध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘नो एंट्री’ फलक लावले गेले; परंतु बेशिस्त चारचाकी वाहनचालक बिनदिक्कतपणे ‘नो एंट्री’मध्ये घुसतात. त्यात चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याने चारचाकी वाहनचालकांची मुजोरी आणखीनच वाढली आहे. मागील आठवड्यामध्ये ‘लोकमत’ने शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला होता. यामध्ये शहरातील भिगवण चौक, इंदापूर चौक, तीनहत्ती चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, गुणवडी चौक आदी ठिकाणांची वाहतूक समस्या गंभीर आहे. यावर नगरपालिका प्रशासनाने प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थित शहर पोलीस प्रशासनासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या महावीर पथ, कचेरी रस्ता या रस्त्यांवरील दुहेरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवले जातात. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील ‘नो एंट्री’चे फलक तर केवळ शोभेसाठीच उभे केले आहेत की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाहतूक समस्येबाबत प्रशासनच गंभीर नसेल तर समस्या सुटणार कशीअसाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.