शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातच होणार विमानतळ!

By admin | Updated: October 6, 2016 03:51 IST

खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक

पिंपरी : खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. खेड तालुक्यात होणाऱ्या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. लांडगे म्हणाले, ‘‘खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार, म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात पंधरा हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योगक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करू नये, अशी मागणी केली होती. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा प्राथमिक स्तरावर अभ्यास करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत.’’