शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया, सुवर्णयुग संघ विजयी

By admin | Updated: May 12, 2017 05:30 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी एअर इंडिया, सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात आपली विजयी घोडदौड सुरू केली. महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने बाबूराव सणस मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात अ गटात एअर इंडिया संघाने बॉम्बे पोर्ट ट्रस्ट संघावर ३४-१७ गुणांनी विजय मिळवित आपल्या नावाला साजेसा खेळ करीत पहिला दिवस गाजविला. मध्यंतराला एअर इंडिया संघाकडे १८-९ अशी आघाडी होती. एअर इंडियाच्या सिद्धार्थ देसाई व मनोज धूल यांनी चौफेर चढाया करीत मैदान दणाणून सोडले. एअर इंडिया सामन्याच्या सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळविली होती. त्यांना विकास काळे याने केलेल्या पकडींची उत्कृष्ट साथ मिळाली. बाँम्बे पोर्ट ट्रस्टच्या शुभम कुंभार व शिवराज जाधव याने खोलवर चढाया करून विजयासाठी जिवाचे रान केले; मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दीपक गोरी याने त्यांना काही चांगल्या पकडी घेत मोलाची साथ देण्याचा प्रयत्न केला. महिला विभागात यजमान सुवर्णयुग संघाने सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानचा ५१-१४ असा धुव्वा उडवित घरच्या मैदानावर शानदार विजय मिळविला. मध्यंतराला सुवर्णयुग संघाकडे २३-५ अशी भक्कम आघाडी होती. सुवर्णयुग संघाची आंतराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ व ईश्वरी कोंढाळकर यांनी उत्कृष्ट खेळ करीत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यांना कोमल जोरी व हर्षदा सोनवणे यांनी काही चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सह्याद्री क्रीडा प्रतिष्ठानच्या प्रियंका गरदास हिने चांगला प्रतिकार केला. तर प्रतीक्षा दाभाडे हिने चांगल्या पकडी केल्या. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सूर्यंवशी, माणिक सावंत, सुनील रासने, अनंता शेळके, राजेंद्र घोडके, उल्हास भट, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे, सहकार्यवाह संदेश जाधव, शांताराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला सुवर्णयुग संघाची आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली.