शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी हवा संरक्षण मंत्रालयाचा ‘क्लिअरन्स’

By admin | Updated: May 5, 2017 23:55 IST

पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या आराखड्याला केंद्रिय संरक्षण मंत्रालय आणि केंद्रिय विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयाचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या आराखड्याला केंद्रिय संरक्षण मंत्रालय आणि केंद्रिय विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्यालयाचा अनुकूल अभिप्राय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीमध्ये 15 मे रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुरंदरमध्ये दोन हजार ३६७ हेक्टरवर विमानतळ होणार आहे. पुरंदरमधील विमानतळासंदर्भात मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लष्कराचे दक्षिण मुख्यालय पुण्यामध्ये असल्याने विमानतळाच्या कामाला सुरुवात करण्यापुर्वी संरक्षण मंत्रालयासह विमानतळ प्राधिकरणाचा सकारात्मक अभिप्राय आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. विमानतळासाठी एक वर्षाच्या आतमध्ये भूसंपादन प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. सात गावांसाठी सात उपजिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहेत. गावठाणे वगळून प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासोबतच या भागाचे ‘सोशिओ इकोनॉमी’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालय व विमानतळ प्राधिकरणाने अभिप्राय दिल्यानंतर राज्य शासन अध्यादेश काढणार आहे. भूसंपादनासाठी दिलेल्या चार पर्यायांसदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.