शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दहा रुपयात होणार ‘वातानुकूलित’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST

पुणे : महापालिकेच्यावतीने अवघ्या दहा रुपयांत दिवसभरासाठी वातानुकूलित बस प्रवास योजना आणण्यात आली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे ...

पुणे : महापालिकेच्यावतीने अवघ्या दहा रुपयांत दिवसभरासाठी वातानुकूलित बस प्रवास योजना आणण्यात आली आहे. या योजनेला ‘पुण्यदशम’ असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ९ जुलैपासून आकर्षक गुलाबी रंगसंगतीच्या ५० मीडी बसेस पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि पेठांमध्ये प्रवासासाठी देण्यात येणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये ३०० आणखी बस उपलब्ध केल्या जाणार आहेत. संपूर्ण शहरात सहा विभागांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना मांडली होती. या योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली. दिवसभरामध्ये दहा रुपयात वातानुकूलित बसमधून कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. सीएनजीवर चालणाऱ्या या मिडी बसची आसन क्षमता २४ आहे. छोटी बस असल्याने मध्यवस्तीतील लहान रस्त्यांवरुनही ही बस धावू शकणार आहे.

====

स्वस्त, गतिमान, आरामदायी, वेळेची बचत करणारा, सुरक्षित प्रवास ही या योजनेची खास वैशिष्ट्ये आहेत. वाहतुकीची कोंडी पार्किंगची समस्या, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. प्रवाशाचा वेळ, पैसा, इंधन याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकेल. पुण्यदशमच्या माध्यमातून खासगी वाहनांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

====

पहिल्या टप्प्यातील समाविष्ट भाग

डेक्कन ते पूलगेट, स्वारगेट से पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गाच्या दरम्यान येणाऱ्या सर्व पेठा आणि मध्यवर्ती भाग

या योजनेचा प्रारंभ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (ता. ९ जुलै) दुपारी १ वाजता आर्यन पार्किंग, महात्मा फुले मंडई येथे होणार आहे.