शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात अहमदनगर, सोलापूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर ...

पुणे : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यामध्ये पुणे विभागात अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा अव्वल ठरले आहेत. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची टक्केवारी ९९.९७ एवढी आहे, तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. पुणे विभागात केवळ ९७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

पुणे विभागात एकूण २ लाख ६५ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ६५ हजार ८०१ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून २ लाख ६५ हजार ७०४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाची निकालाची एकूण टक्केवारी ९९.९६ आहे. त्यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९७, तर मुलांचे ९९.९५ इतके आहे. तर पुनर्परीक्षार्थी अर्थात रिपीटर विद्यार्थ्यांचा पुणे विभागाचा निकाल ९१.८६ टक्‍के लागला आहे. तसेच प्रावीण्यासह प्रथम श्रेणी किंवा ७५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख २ हजार ४७६ इतके विद्यार्थी आहेत. तर प्रथम श्रेणी किंवा ६० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे १ लाख १६ हजार १७२ विद्यार्थी, तर दि्वतीय श्रेणी किंवा ४५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळवणारे ४४ हजार ९२८ विद्यार्थी असून उत्तीर्ण श्रेणी किंवा ३५ टक्क्यांच्या पुढे गुणे मिळवणारे २ हजार १२८ विद्यार्थी आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा निकाल :

अहमदनगर जिल्ह्यातील ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ७० हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. नगर जिल्ह्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १९ इतकी आहे. मुलींचे उत्तीर्णाचे प्रमाण ९९.९८, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६ टक्के इतकी आहे.

सोलापू जिल्ह्याचा निकाल :

सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार १९६ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६५ हजार १९३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून ६५ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९७ इतकी आहे. सोलापुरात अनुत्तीर्णाची संख्या १७ इतकी आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९६, तर मुलींचे ९९.९८ टक्के इतकी आहे.

पुणे जिल्ह्याचा निकाल :

पुणे जिल्ह्यातील १ लाख ३० हजार २९ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार २३ विद्यार्थ्यांना मूल्यांकन प्राप्त झाले असून १ लाख २९ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे. म्हणजेच पुण्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या फक्‍त ६१ एवढी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.९३ टक्के तर मुलींचे ९९.९७ टक्के आहे.