शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोसाठी १ हजार ३५० कोटी रुपयांचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) यांच्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय व युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (इआयबी) यांच्यात १५० दक्षलक्ष युरोंच्या ( १३५० कोटी रुपये) वित्तीय करारावर शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबीचे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, के. राजारामन यांनी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. तर, इआयबीचे उपाध्यक्ष क्रिस्तियन केटल थॉमसन यांनी इआयबीच्या वतीने स्वाक्षरी केली.

इआयबीने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण ६०० दक्षलक्ष युरोंचे कर्ज मंजूर केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० दशलक्ष युरोंचा वित्तीय करार २२ जुलै २०१९ रोजी करण्यात आला होता. त्यातून झालेल्या कामाचा आढावा घेऊन वित्तीय कंपनीने कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.

या दुसऱ्या टप्प्यातील कर्जातून आता मेट्रोसाठीच्या कोचची (डबे) खरेदी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेड (महामेट्रो) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग यात आहेत. एकूण अंतर ३१ किलोमीटरचे असून त्यामधील शिवाजीनगर ते स्वारगेट हे ५ किलोमीटरचे अंतर भुयारी आहे. संपूर्ण प्रकल्प ११ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. इआयबीशिवाय अन्य काही परदेशी वित्तीय कंपन्यांकडूनही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेण्यात आले आहे.