शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

चोरट्यांकडून वृद्धांना बेदम मारहाण

By admin | Updated: February 3, 2017 03:59 IST

भांबुरवाडी-वाळुंजस्थळ (ता. खेड) येथे चोरट्यांनी वृद्धांना बेदम मारहाण करून घरातील ७० हजार रुपांयाची रोकड व अंगावरील दागिने असा ऐवज लांबविला. पहाटेच्या

दावडी : भांबुरवाडी-वाळुंजस्थळ (ता. खेड) येथे चोरट्यांनी वृद्धांना बेदम मारहाण करून घरातील ७० हजार रुपांयाची रोकड व अंगावरील दागिने असा ऐवज लांबविला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, रात्रीत तीन ठिकाणी या परिसरात चोरी झाली. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. येथील बाळासाहेब बाबूराव वाळुंज (वय ७५) व त्यांच्या पत्नी बारकाबाई बाळासाहेब वाळुंज (वय ७०) यांच्या घराचा दरवाजा पहाटे ३ वाजता तीन ते चार चोरट्यांनी उघडून दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केले. बाळासाहेब यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बारकाबाई यांच्या कानाला चावा घेऊन कानातील सोन्याच्या कुड्या, गळ्यातील मंगळसूत्र असे चार तोळ्यांचे दागिने व कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले. चोरट्यांनी अंगात टी शर्ट व बरमुडा घातला होता. तसेच त्याच रात्री रोडेवस्ती येथील संतोष रोडे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी मारहाण करुन घरातील अडीच हजार रुपये घेऊन पलायन केले. तुकाईवाडी येथील शरद कोरडे घरात चोरट्यांनी प्रवेश करुन मारायची भीती दाखवून तीन ग्रॅम सोन्याचा दागिना लांबविला. याबाबत येथील ग्रामस्थ भाऊसाहेब ढोरे, प्रकाश वाळुंज, शरद वाळुंज, महेंद्र वाळुंज यांनी या घटनेची माहिती सकाळी ५.३० वाजता दिली. खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, उपनिरीक्षक चेतन माने, डी. एस. महाडिक यांनी घटनास्थळी येऊन जखमींची विचारपूस करून तीनही ठिकाणी पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. पुणे येथून श्वानपथक व फिंगरप्रिंट पथक दुपारी घटनास्थळी आले. श्वानाने चोरट्यांचा पळून जाण्याचा शेतामधील बांधापर्यंत मार्ग दाखवला. फिंगरप्रिंट विभागातील कर्मचारी यांनी रक्ताचे नमुने व घडलेल्या जागेची पाहणी केली.