पुणे : हातगाडीचालक, पथारी व्यावसायिक आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरुद्ध कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. या कारवाईत ८० व्यावसायिकांंचा माल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी रस्ता, बाबाजान चौक, फातिमानगर, प्रिन्स आॅफ वेल्स रोड या परिसरात बुधवारी दिवसभरात कारवाई केली. गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक संजय झेंडे यांनी नमूद केले. अतिक्रमणविरोधी कारवाईच्यावेळी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात कारवाई होणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. बोर्डाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. गेल्या आठवड्यात कारवाई झाली होती. बुधवारी दिवसभरात बाजाराची ठिकाणे असलेल्या महात्मा गांधी रस्ता, बाबाजान चौक, फातिमानगर, प्रिन्स आॅफ वेल्स रोडवर कारवाई झाली. या कारवाईत ८० व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला नाशवंत माल नष्ट केला जात आहे. अन्य माल परत द्यावयाचा किंवा कसे, याबाबत सर्वसाधारण सभेपर्यंत निर्णय होणार नाही. माल माघारी देण्यात येत नसल्याने व्यावसायिकांमध्ये या कारवाईची जरब निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
अतिक्रमणाविरोधी जोरदार मोहीम
By admin | Updated: August 14, 2015 03:04 IST