शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोटाच्या मागं धावता धावता शिकायचं वय सरलं

By admin | Updated: December 10, 2015 01:28 IST

पोटाच्या मागे धावता धावता... शिक्षणाचं वय निघून चाललंय... कष्ट करताना जीवाची पर्वा नाही... जादा काम केलं तर जादा मजुरी मिळणार.

माळेगाव : पोटाच्या मागे धावता धावता... शिक्षणाचं वय निघून चाललंय... कष्ट करताना जीवाची पर्वा नाही... जादा काम केलं तर जादा मजुरी मिळणार... मग कष्ट करताना हयगय नाही. उसाच्या ट्रॉलीला कपड्याने बांधून घेऊन अवजड मोळी वर फेकण्याची कसरत करताना ऊसतोडणी कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहत आहेत. माळेगाव (ता. बारामती) व आसपासच्या परिसरामध्ये ऊसतोड मजूर आणि त्यांची तरुण मुले जीवघेणी कसरत करीत असल्याचे दृश्य सध्या पाहावयास मिळत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अधिकाधिक ऊस भरण्यासाठी जणू त्यांची स्पर्धाच चालल्याचे दिसते. उसाची मोळी घेऊन लाकडी फळीवरून पळत पळत चढणे, पोटाला कापडाने बांधून घेऊन ट्रॉलीला लटकत राहणे, पन्नास-पन्नास किलोची मोळी वीट फेकल्यासारखी फेकणे व झेलणे, पूर्णपणे भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून प्रवास करणे हे व असे कितीतरी जीवघेणे प्रकार ऊसतोड मजूर करीत असल्याचे दिसत आहे. त्यातच फडावर छोटी मुले कोयता चालवत असल्याचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे.एकीकडे सरकार बालमजुरीवर आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे ऊसतोड मजूर आपल्या चिमुरड्यांची मदत घेत असल्याचे दिसते. शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र ऊसतोड मजुरांची मुलं फडावरच का, असा प्रश्नही उभा राहतो.ही मुलं विहिरी, नदी-नाल्यावर, गर्दीच्या रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. सध्या पाण्यासाठी भटकंती, शिक्षणाचा अभाव, निवाऱ्याची समस्या, औषधपाण्याची समस्या या व अशा कितीतरी समस्या सध्या प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. (वार्ताहर)